बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत असते. तिने केवळ ८ तास काम करण्याची मागणी केल्यामुळे तिला संदीप रेड्डी वंगा यांच्या 'स्पिरिट' आणि प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' यांसारख्या मोठ्या चित्रपटांमधून बाहेर काढण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या बातम्या सर्वत्र पसरल्यानंतर आता दीपिका पादुकोणने या वादावर आपले मौन सोडले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान दीपिका पादुकोणने या विषयावर आपले मत मांडले आणि सांगितले की, पुरुष सुपरस्टार अनेक वर्षांपासून ८ तास काम करत आहेत.
सीएनबीसी टीव्ही १८ला दिलेल्या मुलाखतीत दीपिका पादुकोणने ८ तास काम करण्याच्या मागणीवर आपलं स्पष्ट मत व्यक्त केले. दीपिका म्हणाली,''एक महिला म्हणून जर या गोष्टी तुम्हाला दबावासारख्या वाटत असतील, तर समजा तसे आहे. पण या गोष्टींमध्ये कोणतेही गुपित नाही; या भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरस्टार, पुरुष सुपरस्टार अनेक वर्षांपासून ८ तास काम करताना दिसत आहेत, पण या गोष्टी कधीच चर्चेत आल्या नाहीत.''
''मी कोणाचेही नाव घेणार नाही...''
दीपिका पादुकोणने पुढे बोलताना सांगितले, मी कोणाचेही नाव घेणार नाही. जर मी तसे केले, तर त्याचा मोठा मुद्दा बनेल आणि मला तसे होऊ द्यायचे नाही. लोकांना हे माहित असायला हवे की अनेक पुरुष कलाकार दररोज ८ तास काम करत आले आहेत, ही एक सामान्य गोष्ट आहे. त्यापैकी अनेक जण सोमवार ते शुक्रवारपर्यंत फक्त ८ तास काम करतात. ते वीकेंड्सला कामही करत नाहीत.
वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, दीपिका पादुकोणकडे सध्या बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा 'किंग' हा चित्रपट आहे. दीपिका पादुकोणने या चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण व्यतिरिक्त अर्शद वारसी, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. 'किंग' व्यतिरिक्त दीपिका पादुकोणकडे अल्लू अर्जुन आणि ॲटली कुमार यांचा एक बिग बजेट चित्रपट देखील आहे.
Web Summary : Deepika Padukone addressed rumors of being dropped from films due to her 8-hour work demand. She highlighted that male superstars have followed similar schedules for years without controversy, emphasizing gender disparity in the industry.
Web Summary : दीपिका पादुकोण ने 8 घंटे काम की मांग के कारण फिल्मों से निकाले जाने की अफवाहों पर प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि पुरुष सुपरस्टार सालों से ऐसा कर रहे हैं, लेकिन इस पर कभी विवाद नहीं हुआ, जो लैंगिक असमानता को दर्शाता है।