Join us

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी राणी पद्मावतीबनत दीपिका पादुकोणचे झाले आगमन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 10:47 IST

काल आम्ही तुम्हाला सांगितलेच होते की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संजय लीला भन्साळी आपला आगामी चित्रपट पद्मावतीचा फर्स्ट लूक लाँच ...

काल आम्ही तुम्हाला सांगितलेच होते की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संजय लीला भन्साळी आपला आगामी चित्रपट पद्मावतीचा फर्स्ट लूक लाँच करणार आहे. आज सकाळी दीपिका पादुकोणने आपल्या  ट्विटर अकाऊंटवरुन राणी पद्मावतीचा लूक रिव्हिल केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांमध्ये राणी पद्मावतीच्या लूक जाणून घेण्याबाबत उत्सुकता होती. आता फॅन्सची ही उत्सुकता संपली आहे पद्मावतीचा पहिले पोस्टर फॅन्ससमोर आले आहे. यात पोस्टरमध्ये दीपिका एकदम रॉयल लूकमध्ये दिसते आहे. यात तिचे पेहराव एखाद्या राणीला शोभेल असाच आहे. बुधवारी दीपिकाने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन चाहत्यांना  सांगितले होते की, राणी पद्मावती येते आहे उद्या सूर्योद्याबरोबर. संजय लीला भन्साळी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाची टीम खूप मेहनत घेताना दिसते आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ट्रॅव्हलिंगसाठी दिवसाचे चार तास जायचे म्हणून काही दिवस शाहिद कपूर गोरेगाव फिल्म सिटीच्या जवळच्या हॉटेलमध्ये राहात होता. यात शाहिद कपूर चित्तौडचा राजा रावल रत्न सिंगचा भूमिकेत झळकणार आहे. हि भूमिका साकारण्यासाठी शाहिदने सहा प्रकारच्या तलवार बाजीचे प्रशिक्षणसुद्धा घेतले आहे. तर  रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत झळकणार आहे.ALSO READ : नवरात्रीमध्ये राणी पद्मावतीमधला दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक होणार लाँच !हा चित्रपट आधी नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता मात्र चित्रपटाचे काही सीन्स शूटिंगचे बाकी असल्याने चित्रपटाची रिलीज डेटपुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट एक डिसेंबरला रिलीज करण्यात येणार आहे. हा एक बिगबजेट चित्रपट आहे. यासाठी दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर यांना 11 कोटी तर रणवीर सिंगला 13 कोटींचे मानधन देण्यात आले आहे. या चित्रपटानंतर दीपिकाच्या मानधनात वाढ झाल्याची चर्चा होती. पद्मावती 500 पेक्षा जास्त थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे आणि 8 हजार स्क्रिनवर दिसणार आहे. चित्रपटाचा बजेट जवळपास 175 कोटींचा आहे. चित्रपटाच्या क्लाइमैक्स सीनवर जवळपास 12 कोटी खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे.