Join us  

मेघना गुलजारच्या आगामी सिनेमात दिसणार दीपिका पादुकोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 11:34 AM

दीपिका पादुकोणच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खुशखबर आहे. दीपिका पादुकोण मेघना गुलजारच्या आगामी सिनेमा दिसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमेघना आगामी सिनेमासाठी दीपिकाला साईन करण्याची शक्यता आहे'चालबाज'च्या रिमेकसाठी दीपिकाला अप्रोच करण्यात आले होते

दीपिका पादुकोणच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खुशखबर आहे. दीपिका पादुकोण मेघना गुलजारच्या आगामी सिनेमा दिसण्याची शक्यता आहे. मेघनाचा नुकताच येऊन गेलेल्या 'राजी' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.  

सध्या मेघना तिच्या आगामी सिनेमासाठी अभिनेत्रीचा शोध घेते आहे आणि यासाठी दीपिकाला साईन करण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत काही कन्फर्म झालेले नाही.  पद्मावतनंतर दीपिकाने एकहा सिनेमा अजून साईन केलेला नाही. यामागचे कारण दीपिका आणि रणवीरचे लग्न असल्याचे सांगितले जात होते मात्र आता सिनेमात काम करण्यासाठी दीपिका एक्साईडेट असल्याचे समजतेय. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की 'चालबाज'च्या रिमेकसाठी दीपिकाला अप्रोच करण्यात आले होते. चालबाजमध्ये श्रीदेवी यांनी डबल रोल प्ले केला होता याच्या रिमेकमध्ये मेकर्स दीपिकाला घेण्यासाठी उत्सुक आहेत. ‘एक्सएक्सएक्स- रिटर्न ऑफ जेंडर केज’ पुढील भागातही दीपिकाची वर्णी लागणार आहे अशी माहिती मिळतेय. 

दीपिका आणि रणवीरचे लग्न याचवर्षी 20 नोव्हेंबरला इटलीमध्ये होऊ शकते. लग्नासाठी या कपलने इटलीच्या लेक कोमो, लोम्बार्डी नावाचे ठिकाण सिलेक्ट केले आहे. बीच हॉलिडेसाठी याला बेस्ट डेस्टिनेशन म्हटले जाते. लेक कोमो हे इटली येथील तिसरा सर्वात मोठा तलाव आहे. हा तलाव 1300 फूट खोल आणि 146 स्क्वेअर किलोमीटर लांब आहे.रिपोर्टनुसार, दोघांचे लग्न दाक्षिणात्य पद्धतीने होणार आहे. पहिले दोघांच्या लग्नाची तारीख 10 नोब्हेंबर ठरवण्यात आली होती.  यानंतर 20 नोव्हेंबर ही तारीख ठरवण्यात आली.  दीपिका सध्या कोणताही नवा प्रोजक्ट हातात घेत नाही आहे. दीपिका आणि रणवीर गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग