Join us

‘सीक्रेट हॉलिडे’वर एकमेकांच्या हात घालून फिरताना दिसले रणवीर सिंग- दीपिका पादुकोण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 09:48 IST

रणवीर सिंग व दीपिका पादुकोण सध्या कुठे आहेत? तर एका सीक्रेट जागी, सीक्रेट हॉलिडे एन्जॉय करत आहेत. अर्थात आता त्यांचा हा सीक्रेट प्लान सीक्रेट राहिलेला नाही, हे सांगणे नकोच.

रणवीर सिंग व दीपिका पादुकोण सध्या कुठे आहेत? तर एका सीक्रेट जागी, सीक्रेट हॉलिडे एन्जॉय करत आहेत. अर्थात आता त्यांचा हा सीक्रेट प्लान सीक्रेट राहिलेला नाही, हे सांगणे नकोच. रणवीर व दीपिका सध्या फ्लोरिडामध्ये आहेत आणि या देशाच्या रस्त्यांवर एकमेकांच्या हातात हात गुंफून फिरताहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. हा व्हिडिओ डिज्नीलँडचा असल्याचे भासतेय.

दीपवीर हातात हात घालून फिरत असताना एका फॅनने त्यांचा हा व्हिडिओ बनवला. आपल्या समोर चक्क दीपिका व रणवीर आहेत, यावर काही क्षण या फॅनचाही विश्वास बसेना. व्हिडिओत दीपिका व रणवीर दोघेही कूल लूकमध्ये आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत दीपिकाची बहीण अनीशा ही सुद्धा आहे.

सध्या दीपिका व रणवीरच्या लग्नाची चर्चा जोरात आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये बॉलिवूडचे हे सगळ्यात रोमॅन्टिक कपल लग्न करणार, अशी चर्चा आहे. काही रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार, हे लग्न हैदराबादेत होणार आहे तर काहींनी हे लग्न इटलीत होणार, असा दावा केला आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार, रणवीर व दीपिका दोघांनाही डेस्टिनेशन वेडिंग हवे आहे. यासाठी त्यांनी इटलीतील लेक कोमो या ठिकाणाची निवड केली आहे. लेक कोमो हे इटली येथील तिसरा सर्वात मोठा तलाव आहे. हा तलाव 1300 फूट खोल आणि 146 स्क्वेअर किलोमीटर लांब आहे.

दोघांचाही ‘रोका’ फार पूर्वीच झाल्याचे मानले जात आहे. रिपोर्टनुसार, दोघांचे लग्न दाक्षिणात्य पद्धतीने होणार आहे. पहिले दोघांच्या लग्नाची तारीख 19 नोब्हेंबर ठरवण्यात आली होती. परंतू दोघांना ही तारीख योग्य वाटली नाही. यानंतर 10 नोव्हेंबर ही तारीख ठरवण्यात आली. कारण रणवीरला सिंबा चित्रपट लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे असे वृत्त होते. तर दीपिका सध्या कोणताही नवा प्रोजक्ट हातात घेत नाही आहे. दीपिका आणि रणवीर गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी कधीच पब्लिकली आपले रिलेशन स्वीकारले नाही. परंतू सोशल मीडियावरील त्यांचे पोस्ट पाहून ते रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जात होते. आता तर रणवीर दीपिकाच्या इंस्टाग्राम फोटोवर ओपनली कमेंट करत असतो. 9 जुलैला दीपिकाने आपल्या केसांवर गुलाब लावून फोटो शेअर केला होता. यावर रणवीरने कमेंट करण्याऐवजी 5 किस इमोजी पाठवल्या होत्या. 

 

टॅग्स :दीपिका पादुकोण