निनासोबत दिपीकाचा सेल्फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 09:28 IST
आपल्याला तर माहितीच आहे की, दीपिका पदुकोन ही विन डिजेल याच्यासोबत आगामी चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ ...
निनासोबत दिपीकाचा सेल्फी
आपल्याला तर माहितीच आहे की, दीपिका पदुकोन ही विन डिजेल याच्यासोबत आगामी चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ साठी शूटिंग करत आहे. श्रीलंकेवरून आल्यानंतर ती लगेचच शूटिंगसाठी जॉईन झाली.काही दिवसांच्या शूटींगपासून मिळालेल्या सुट्ट्यांमुळे ती एकदम फ्रेशच झाली. दिग्दर्शक डी.जे.करूसो याने दीपिका पदुकोन कोस्टार निना डोब्रेव्ह सोबत शूटींग करत आहे. चित्रपटात विन डिजेल, सॅम्युअल एल. जॅक्सन, टोनी जा, डोनी येन आणि दीपिका पदुकोन हे असणार आहेत.हा चित्रपट म्हणजे २००२ मधील ट्रिपल एक्स आणि २००५ च्या ‘ट्रिपल एक्स : स्टेट आॅफ द युनियन चा सिक्वेल आहे. चित्रपट २० जानेवारी २०१७ ला रिलीज होणार आहे.