Join us

रामानंद सागर यांच्या 'रामायण'मधील सीता दीपिका चिखलिया दिसणार ह्या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 14:35 IST

१९८६ मध्ये रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये सीतेची भूमिका साकारलेली अभिनेत्री दीपिका चिखलिया रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.

ठळक मुद्देमराठी नटसम्राट चित्रपट आता गुजरातीमध्ये

१९८६ मध्ये रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये सीतेची भूमिका साकारलेली अभिनेत्री दीपिका चिखलिया रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. त्या 'नटसम्राट' या मराठी चित्रपटाच्या गुजराती रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मराठी नटसम्राट चित्रपटात नाना पाटेकर यांनी साकारलेली नटसम्राटची भूमिका गुजराती अभिनेता सिद्धार्थ रेंडरिया करताना दिसणार आहेत. 

गुजराती 'नटसम्राट' चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत गिलातर यांनी केले आहे. त्यांनी या चित्रपटापूर्वी 'चॉक अॅण्ड डस्टर'  सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात जुही चावला, रिचा चड्ढा हे मुख्य भूमिकेत आहेत. रामायण नंतर, दीपिका यांनी काही मालिकेत काम केले.  त्यानंतर एका कॉस्मेटिक कंपनीचे मालक हेमंत टोपीवाला यांच्याशी लग्न झाल्यानंतर दीपिका यांनी स्वतःहून इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला. मनोरंजन ही स्ट्रीम सोडल्यानंतर दीपिका यांनी आपल्या व्यवसायात पतीची मदत केली. अभिनेत्री दीपिकाला दोन सुंदर मुली आहेत निधी आणि जुही.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाला जेव्हा चित्रपटासाठी संपर्क साधता आला तेव्हा जयंत गिलातर माहित नव्हते. तेव्हा तिने पहिल्यांदा जयंत यांच्याशी बोलल्या तेव्हा त्यांना समजले की त्यांनी 'चॉक अॅण्ड डस्टर' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यांनी चित्रपटाला होकार देण्याआधी आधी "चॉक अॅण्ड डस्टर" चित्रपट पहिला आणि मग त्या चित्रपटासाठी तयार झाल्या. त्यांनी मराठी नटसम्राट पाहिला आणि चित्रपटाच्या गुजराती नटसम्राटमध्ये काम करण्यास सहमती दर्शवली.गुजराती नटसम्राट ३० ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.