दीपिका आणि रणवीर यांच्या नात्यांची पुन्हा चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 19:32 IST
बॉलीवुडची सुपरस्टार दीपिका पदुकोन ही बेस्ट फ्रेंडच्या लग्नासाठी कॅनडाहून थेट श्रीलंकेला पोहोचली आणि विशेष म्हणजे या लग्नासाठी अभिनेता रणवीर ...
दीपिका आणि रणवीर यांच्या नात्यांची पुन्हा चर्चा
बॉलीवुडची सुपरस्टार दीपिका पदुकोन ही बेस्ट फ्रेंडच्या लग्नासाठी कॅनडाहून थेट श्रीलंकेला पोहोचली आणि विशेष म्हणजे या लग्नासाठी अभिनेता रणवीर सिंगही तिथे आला होता. या लग्नात हे दोघेही पुन्हा एकत्र दिसल्याने त्यांच्या या नात्याबद्दल चर्चा पुन्हा सुरू झाली. दीपिका सध्या तिच्या हॉलिवूडमधील पदार्पणाच्या चित्रपटासाठी कॅनडामध्ये शूटिंग करत आहे. या लग्नासाठी रणवीर सिंग आणि दीपिकाची आईही श्रीलंकेमध्ये आले होते. लग्नात रणवीर सिंग त्याचबरोबर दीपिका आणि तिची आई पाहुण्यांसोबत बोलतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर दिसत आहेत. लग्नासाठी दीपिकाने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. गेल्या महिन्यात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी रणवीर टोरांटोला गेला होता. अचानकपणे दीपिकांच्या सेटवर जाऊन त्याने तिला आश्चयार्चा धक्काही दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या लग्नाच्या निमित्ताने हे दोघेजण एकत्र दिसले.