Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगातील १० अभिनेत्रींमध्ये दीपिका !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 18:17 IST

फोर्ब्सने नुकतीच सर्वाधिक जास्त कमाई करणाऱ्या जगातील १० अभिनेत्रींची यादी जाहीर केली. त्यात भारतीय अभिनेत्री दीपिका पादुकोण दहाव्या स्थानावर आहे. ...

फोर्ब्सने नुकतीच सर्वाधिक जास्त कमाई करणाऱ्या जगातील १० अभिनेत्रींची यादी जाहीर केली. त्यात भारतीय अभिनेत्री दीपिका पादुकोण दहाव्या स्थानावर आहे. दीपिका जागतिक पातळीवर प्रसिद्ध असून तिने आतापर्यंत मोठे स्टारडम मिळविले आहे. या यादीत अमेरिकन अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स अव्वल स्थानी आहे. तिची वार्षिक कमाई ४६ मिलीयन डॉलर एवढी आहे. मकार्थी दुसऱ्या स्थानावर आहे, तर ‘कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर’ फेम स्कारलेट जॉन्सन २५ मिलीयन डॉलर्ससह तिसऱ्या स्थानावर आहे.दीपिका पादुकोणची या वषार्ची कमाई १० मिलीयन डॉलर एवढी आहे. फोर्ब्सच्या यादीत एंट्री करणारी दीपिका एकमेव नवीन अभिनेत्री आहे.