Join us  

Deepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 11:44 AM

दीपवीरचे लग्न मोठ्या थाटात इटलीमध्ये पार पडले. या शाही विवाह सोहळ्याचे फोटो पाहण्याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागली होती.

ठळक मुद्दे दीपिका व रणवीरने मुंबईत २८ नोव्हेंबरला रिसेप्शनचे आयोजन केले आहेदीपवीरने सोशल मीडियावर फॅन्ससाठी फक्त लग्न सोहळ्यातील केवळ दोनच फोटो शेअर केले

दीपवीरचे लग्न मोठ्या थाटात इटलीमध्ये पार पडले. या शाही विवाह सोहळ्याचे फोटो पाहण्याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागली होती. या कपलने आपल्या सोशल मीडियावर फॅन्ससाठी फक्त लग्न सोहळ्यातील केवळ दोनच फोटो शेअर केले. त्यानंतर या लग्नातील आणखीन एक ग्रुप फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. 

या फोटोत रणवीर सिंग-दीपिका पादुकोणसोबत त्यांचे मित्रपरिवार दिसतोय. हा फोटो रणवीरच्या स्टायलिस्ट निताशा गौरवने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केला आहे.  

इटलीतील लेक कोमोमधील वेडिंग मेन्यूवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. लग्नात येणाऱ्या पाहुण्यांच्या मोबाईल कॅमे-याला स्टिकर लावण्यापासून तर ड्रोनवर बंदी घालण्यापर्यंतचा सगळा चोख बंदोबस्त होता. 

बुधवारी १४ नोव्हेंबरला कोंकणी पद्धतीने व गुरूवारी १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. गुरूवारी त्यांनी आनंद कारज रिवाज देखील पूर्ण केली. आनंद कारजमध्ये चार फेरे घेतले जातात. ही विधी दिवसा केली जाते. पारंपारिक हिंदू लग्नात मुहूर्त, जन्मपत्रिका जुळणे महत्त्वाचे असते. मात्र आनंद कारजमध्ये या गोष्टींना तेवढे महत्त्व नाही. शीख धर्मात जे लोक गुरूवर पूर्ण विश्वास व श्रद्धा ठेवतात, तेच आनंद कारजची रितीरिवाज करतात. इटलीत विवाहसोहळा पार पडल्यानंतर दीपिका व रणवीरने मुंबईत २८ नोव्हेंबरला रिसेप्शनचे आयोजन केले आहे. जे रात्री ८ वाजता सुरू होणार आहे.

टॅग्स :दीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंग