Join us
Daily Top 2Weekly Top 5

​मंदना करिमीचा संसार धोक्यात; पती गौरव गुप्ताने घराबाहेर काढले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 10:34 IST

यावर्षी २५ जानेवारीला  ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक मंदना करिमीने बिझनेसमॅन गौरव गुप्ताशी संसार थाटला होता.  पण लग्न होऊन उणेपुरे सहा ...

यावर्षी २५ जानेवारीला  ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक मंदना करिमीने बिझनेसमॅन गौरव गुप्ताशी संसार थाटला होता.  पण लग्न होऊन उणेपुरे सहा महिने होत नाहीत तोच, मंदना व गौरवच्या संसारात कुरबुरी सुरु झाल्या आहेत. कदाचित याला कुरबुरी म्हणणेही चूक ठरेल, कारण प्रकरण बरेच चिघळल्याचे दिसतेय. होय, मंदनाने गत सोमवारी पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. दरमहा १० लाख पोटगी आणि मानसिक त्रास शिवाय आपल्या करिअरच्या नुकसानभरपाईपोटी २ कोटी रुपए देण्याची मागणीही तिने केली आहे.



गौरवने लग्नापूर्वी बळजबरीने मला धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडले.  स्वत:चे अ‍ॅक्टिंग करिअर आणि मॉडेलिंग सोडण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. सात आठवड्यांपूर्वी मला सासरच्यांनी घरातून बाहेर काढले. मी अनेक विनंत्या करूनही माझ्या सासूने मला घरात घेतले नाही. यादरम्यान गौरवने मला मारहाण केली, असे मंदनाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. मंदनाने सासूविरोधातही तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात गौरवशी संपर्क होऊ शकला नाही.

ALSO READ : पहिल्या‘गे’ पतीला सोडून मंदना करिमी झाली मंदना गुप्ता!!

गौरवसोबत मंदनाचे हे दुसरे लग्न असल्याचे म्हटले जाते. २०११ मध्ये मंदनाने ललित तेहलान याच्याशी सीक्रेट मॅरेज केले होते. मात्र या लग्नानंतर ललित हा गे असल्याचे मंदनाला कळले आणि तिने त्याला सोडचिठ्ठी दिली. ललित आणि फॅशन डिझाईनर रोहित बल हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. ललित आणि रोहित या दोघांना अनेक प्रसंगी इंटिमेट होतांना पाहिले गेले आहे. २०११ मध्ये ललित व रोहित या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. यानंतर १८ फेबु्रवारी २०११ रोजी ललितने आर्य समाज मंदिरात मंदनाशी लग्न केले होते. मंदनाने केवळ भारतीय नागरिकत्वासाठी ललितसोबत लग्न केल्याची चर्चाहीत्यावेळी रंगली होती.
१९ मार्च १९८८ रोजी तेहरान(इराण)मध्ये जन्मलेल्या मंदनाने एअरहोस्टेस म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ती मॉडेलिंगकडे वळली. ‘भाग जॉनी’मधून तिने बॉलिवूड डेब्यू केले होते. अनेक चित्रपटांत आयटम साँग आणि लहान-मोठ्या भूमिका केल्यानंतर मंदना गतवर्षी आलेल्या ‘क्या कुल है हम3’मध्ये पहिल्यांदा फीमेल लीड रोलमध्ये दिसली होती. यानंतर मंदनाचे करिअर मार्गी लागेल, असे मानले जात असताना अचानक करिअला करकचून ब्रेक लावत मंदनाने गौरव गुप्ताशी लग्नाचा निर्णय घेतला. ही मोठी रिस्क होती. पण मंदना तिच्या लग्नाच्या निर्णयावर ठाम होती.मला अनेकांनी लग्नाचा निर्णय ही तूर्तास मोठी रिस्क ठरेल, असे सांगितलेयं. पण माझ्यामते, लग्नासाठी ही अगदी योग्य वेळ आहे. करिअरसाठी मी माझे कौटुंबिक आयुष्य पणाला लावू शकत नाही. शेवटी कुटुंबासोबतच यशाचा आनंद साजरा करण्यात खरी मजा आहे, असे ती म्हणाली होती.