Damn Hot : करिना कपूर पुन्हा परतली आपल्या ग्लॅम अवतारात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 13:32 IST
मुलगा तैमूर याच्या जन्मानंतर करिना कपूर एका नव्या, सेक्सी अवतारात परतली आहे. काल करिना एकदम सेक्सी लूकमध्ये दिसली. निमित्त होते करण जोहरची टेरेस पार्टी.
Damn Hot : करिना कपूर पुन्हा परतली आपल्या ग्लॅम अवतारात!
मुलगा तैमूर याच्या जन्मानंतर करिना कपूर एका नव्या, सेक्सी अवतारात परतली आहे. प्रसूतीनंतर काही आठवडे करिना लाईमलाईटपासून दूर होती. पण त्याचा परिणाम इतका सुंदर असेल, याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. करिनाचे ताजे फोटो पाहून तिचे चाहते पुन्हा तिच्या प्रेमात पडल्यावाचून राहणार नाहीत.काल करिना एकदम सेक्सी लूकमध्ये दिसली. नारंगी रंगाचा बॅकलेस नेक ड्रेसमध्ये करिनाचे सौंदर्य अधिकच खुलून आले होते. याशिवाय तिच्या चेह-यावरचे तेजही पाहण्यासारखे होते. निमित्त होते करण जोहरची टेरेस पार्टी. या पार्टीत करिना तिचा हबी सैफ अली खान याच्यासोबत पोहोचली. तिची बहीण करिश्मा कपूरही या पार्टीत हजर होती. याशिवाय अमृता अरोरा, मलायका अरोरा, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा अशी सगळी गँगही होती. या पार्टीत करिना सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या पार्टीत करिनाने धम्माल मस्ती केली. त्याचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. काल-परवाच करिना वांद्रयाच्या एका सलूनमध्येही दिसली होती. यावेळी करिनाचा लूक एकदम वेगळा होता. तिची हेअरस्टाईल एकदम हटके होती. करिनाचे हे बदललेले लूक पाहून ती लवकरच तिच्या कामावर परतणार, असे मानले जात आहे. येत्या मे महिन्यात करिना ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचे शूटींग सुरु करेल, असा अंदाज आहे. ‘वीरे दी वेडिंग’ हा अनिल कपूरची मुलगी रेहा कपूरच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टपैकी एक आहे. यात करिनाशिवाय सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या प्रमुख भूमिका असणार आहे. या चित्रपटासाठी करिनाला तिच्या जुन्या शेपमध्ये परतावे लागणार आहे. कदाचित करिनासाठी हे फारसे कठीण नाही. कारण फेबु्रवारीपासूनच तिने फिटनेस व डाएटवर नव्याने लक्ष केंद्रीत केले आहे. सध्याची तिची झलक पाहून तरी हेच वाटते.Related stories : करिना-तैमूर रॅम्पवर दिसणार एकत्र!करिना कपूर कुणाला करतेय डेट? जाणून घेण्यासाठी वाचा...