Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ ‘डॅडी’ची ऐश्वर्या राजेश भलतीच जोरात! वाचा सविस्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 14:42 IST

अर्जुन रामपाल स्टारर ‘डॅडी’ आज चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. या चित्रपटात अरूण गवळीच्या आॅनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे, ऐश्वर्या ...

अर्जुन रामपाल स्टारर ‘डॅडी’ आज चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. या चित्रपटात अरूण गवळीच्या आॅनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे, ऐश्वर्या राजेश. बॉलिवूडसाठी हे नाव नवे असले तरी तामिळ सिनेमातील हे एक लोकप्रीय नाव आहे. ऐश्वर्याचे अख्खे कुटुंब सिनेमाशी संबंधित आहे. ऐश्वर्याचे वडिल राजेश हे तामिळ सिनेमाचे एक लोकप्रीय अभिनेते आहेत. आई मोठी रंगभूमी कलाकार आहे. चेन्नईत जन्मलेल्या ऐश्वर्याने एका डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतला आणि या शोच्या विजेत्या पदाने तिला एक ओळख दिली. खरे तर टीव्ही अँकर म्हणून ऐश्वर्याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर २०११ मध्ये ती ‘अवरगलुम इवारगलुम’ या तामिळ चित्रपटात दिसली. यानंतर तामिळ इंडस्ट्रीत तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.यानंतर ऐश्वर्याला बॉलिवूडचीही लॉटरी लागली. पाठोपाठ मणिरत्नम यांचा एक मोठा सिनेमाही तिला मिळाला आहे.ALSO READ : ‘डॅडी’ बघून डॉन अरुण गवळीने म्हटले, जरा जास्तच झाले!होय,‘डॅडी’मधून बॉलिवूड डेब्यू करणा-या ऐश्वर्याच्या हाती  एक मोठा प्रोजेक्ट लागला आहे.  मणिरत्नम यांच्या नव्या तामिळ-तेलगू सिनेमात ऐश्वर्या  लीड रोलमध्ये दिसणार आहे. एकंदर काय तर बॉलिवूड डेब्यू आणि मणिरत्नम सारख्या मोठ्या दिग्दर्शकाचा सिनेमा, म्हणजेच ऐश्वर्याची सध्या चांगलीच भरभराट चाललीय.ऐश्वर्या रायला हिंदी येत नाही. त्यामुळे ‘डॅडी’साठी तिची निवड झाली तेव्हा अर्जुन रामपालला (अर्जुनने या चित्रपटात अरूण गवळीची मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. )मोठा धक्का बसला होता. हिंदीच्या प्रत्येक शब्दाला अडखडणारी ही मुलगी कशी काम करणार, अशी चिंता अर्जुनला होती. पण प्रत्यक्ष तिचे काम पाहिल्यावर अर्जुन भलताच चाट पडला. ऐश्वर्याचा अभिनय पाहिल्यानंतर तिच्या हिंदीकडे माझे लक्षच गेले नाही, असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.