तीन मुलांच्या आईसोबत रोमान्स करताना दिसणार ‘दबंग’ सलमान खान !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 20:03 IST
‘बिग बॉस ११’चा सीजन संपताच आता टायगर सलमान खान त्याच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या ‘दबंग-३’ ...
तीन मुलांच्या आईसोबत रोमान्स करताना दिसणार ‘दबंग’ सलमान खान !
‘बिग बॉस ११’चा सीजन संपताच आता टायगर सलमान खान त्याच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या ‘दबंग-३’ या चित्रपटाशी संबंधित काही बातम्या समोर आल्या आहेत. बातम्यांनुसार या चित्रपटात सलमान खान तीन मुलांच्या आईसोबत रोमान्स करताना बघावयास मिळणार आहे. होय, हे खरं आहे. कारण या चित्रपटात सलमान एक नव्हे तर दोन अभिनेत्रींबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे. पहिली अभिनेत्री म्हणून एमी जॅक्सनचे नाव समोर येत आहे, तर दुसरी अभिनेत्री शाहरुख खानच्या ‘फॅन’ या चित्रपटात झळकलेली वलूचा डिसूजा असणार आहे. ३३ वर्षीय वलूचा अभिनयात करिअर करण्याअगोदर मॉडेलिंग क्षेत्रात काम करीत असे. तीन मुलांची आई असलेल्या वलूचाने तिच्या करिअरच्या सुरुवातीला म्हणजेच २००२ साली सुपर मॉडेल मार्क रॉबिन्सन याच्याशी लग्न केले होते. मात्र त्यांच्यातील हे नाते फार काळ टिकले नाही. पुढे २०१३ साली हे दोघे विभक्त झाले. आता वलूचा सलमान खानसोबत झळकणार असल्याने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरं तर या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा असण्याचीही चर्चा आहे. कारण काही दिवसांपूर्वीच निर्माता अरबाज खान एका मुलाखतीत म्हटले होते की, सोनाक्षी सिन्हाला रिप्लेस केले जाणार नाही. अशात हे बघणे महत्त्वाचे ठरेल की, कोणती अभिनेत्री सलमान खानसोबत रोमान्स करताना बघावयास मिळेल.