दबंग सलमान खानला पुन्हा आला राग; म्हटले ‘जास्त उडू नको’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 21:08 IST
बॉलिवडूचा दबंग सलमान खानला कधी अन् कोणाचा राग येईल हे सांगणे मुश्किल आहे. थोडक्यात ‘वाद आणि सलमान’ हे समीकरणच ...
दबंग सलमान खानला पुन्हा आला राग; म्हटले ‘जास्त उडू नको’!
बॉलिवडूचा दबंग सलमान खानला कधी अन् कोणाचा राग येईल हे सांगणे मुश्किल आहे. थोडक्यात ‘वाद आणि सलमान’ हे समीकरणच बनलेले असल्याने तो नेहमीच अशाप्रकारच्या वादांमध्ये अडकत आला आहे. त्यामुळेच तो गेल्या काही दिवसांपासून रागावर नियंत्रण ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत होता. मात्र सलमानसाठी ही बाब जणू काही अशक्यप्राय असल्याने तो पुन्हा एकदा स्वत:वर नियंत्रण ठेवण्यात अयशस्वी ठरला आहे. यावेळेस त्याने एका पत्रकारावर राग व्यक्त करीत ‘जास्त उडू नको’ अशा शब्दांत खडेबोल सुनावले. त्याचे झाले असे की, गेल्या सोमवारी सलमानच्या ‘बीइंग ह्यूमन’ या सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमाप्रसंगी तो एका पत्रकाराशी हुज्जत घालत असल्याचे दिसून आले. जागरण पोर्टल न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, ‘सलमान खानला विचारण्यात आले की, ‘तुझी एक टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी येत आहे. त्यात तू कोणत्या प्रकारच्या टॅलेंटवर फोकस करण्याचा प्रयत्न करणार आहेस?’ या प्रश्नावर सलमानने उत्तर दिले, ‘याविषयी अजून काहीच विचार केला नाही, परंतु पाजी यापेक्षा जास्त उडो नको प्लीज. या प्रश्नापुरताच मर्यादित रहा. कारण याठिकाणी चर्चा बीइंग ह्यूमन सायकल कंपनीविषयी होत आहे. परंतु तू ‘ट्यूबलाइट’वरून, मॅनेजमेंट कंपनीवर घसरला. तू माझे काम मॅनेज करणार आहेस काय?’ सलमानचे हे उत्तर उपस्थिताना चांगलेच खटकले. सलमाननेही विषय फारसा न वाढविता, दुसºया प्रश्नाकडे लक्ष दिले. सध्या सलमान चित्रपटांव्यतिरिक्त अनेक बिझनेसकडे वळत आहे. इंडस्ट्रीमध्ये त्याने अनेक छोट्या कंपन्या सुरू केल्या आहेत. असे म्हटले जात आहे की, सलमान लवकरच एक मॅनेजमेंट कंपनी सुरू करणार आहे. या मॅनेजमेंट कंपनीची संपूर्ण जबाबदारी त्याचा लहान भाऊ सोहेल खान सांभाळणार आहे. सलमानने हा निर्णय त्याची पूर्व मॅनेजर रेश्मा शेट्टी हिला इंडस्ट्रीतून हद्दपार करण्यासाठी घेतला असल्याची सध्या चर्चा रंगत आहे.