Join us  

Dabangg 3 Audience Review : भाई कब तक? सलमान खानचा ‘दबंग 3’ पाहून भडकले लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 2:11 PM

Dabangg 3 Movie Audience Review : नाराजी व्यक्त करणा-यांमध्ये सलमानचे काही चाहतेही आहेत. 

ठळक मुद्देएका युजरने तर एका ओळीत चित्रपटाचा रिव्ह्यू दिला. ‘घटिया और फ्लॉप’,असे त्याने लिहिले.

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ म्हणून ओळखला जाणारा सलमान खानचादबंग 3’ हा सिनेमा आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भाईजानने जीवतोड मेहनत केली. साहजिकच रिलीजपूर्वी चित्रपटाची चर्चा झाली. पण रिलीजनंतर भाईजानच्या चाहत्यांची पुरती निराशा झालेली दिसतेय. होय, सोशल मीडियावरच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया बघता सलमानचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला नसल्याचे स्पष्ट दिसतेय.‘दबंग 3’ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एकीकडे सलमानच्या डायहार्ट फॅन्सला हा सिनेमा नेहमीप्रमाणे आवडला. पण काही युजर्सनी मात्र ‘दबंग 3’वर नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, नाराजी व्यक्त करणा-यांमध्ये सलमानचे काही चाहतेही आहेत. 

‘मला फ्रीमध्ये तिकिट मिळाले होते. पण चित्रपट पाहिल्यानंतर मी फ्रीमध्येही का तिकिट घेतले, असे मला वाटले. सलमान भाई आखीर कब तक़.. चांगले चित्रपट बनव, नाहीतर संन्यास घे,’ असे एका चाहत्याने लिहिले.

एका युजरने ‘दबंग 3’ची चांगलीच खिल्ली उडवली. ‘हा सिनेमा घाईघाईत बनवला असावा. कदाचित ‘राधे’ बनवण्याच्या नादात घाईघाईत सिनेमा उरकला गेला. ईदवर येणार ना? घाबरणार तर नाहीस?’ अशी खोचक प्रतिक्रिया एका युजरने दिली.एका युजरने तर एका ओळीत चित्रपटाचा रिव्ह्यू दिला. ‘घटिया और फ्लॉप’,असे त्याने लिहिले.

अन्य एका युजरनेही ‘दबंग 3’ पाहिल्यानंतर निराशाजनक प्रतिक्रिया दिली.

 

 

‘चित्रपटाचा फर्स्ट हाफ टॉर्चरने भरलेला आहे. सोनाक्षी व सलमानचे टॉर्चर पाहून माझे सोबती चित्रपट अर्धवट सोडून निघून गेले. माझी पत्नीही नाराज झाली,’ असे या युजरने लिहिले. अर्थात काहींना हा सिनेमा आवडला. अशात भाईजानचा ‘दबंग 3’ किती कमाई करतो, ते बघूच.

टॅग्स :दबंग 3सलमान खान