Join us

सलमान खानच्या फॅन्ससाठी खुशखबर, यादिवशी रिलीज होऊ शकतो 'दबंग3'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 13:03 IST

सलमान खानच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खुशखबर आहे. सलमान खानचा 'दबंग 3' डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. 9 डिसेंबरला ...

सलमान खानच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खुशखबर आहे. सलमान खानचा 'दबंग 3' डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. 9 डिसेंबरला 'दबंग 3' रिलीज होणार असल्याचे कळतेय. सलमानला 'दबंग 3' चित्रपट शाहरुख खानच्या 'झिरो'च्या आधी रिलीज करायचा आहे. सलमानला झिरो आणि दबंग3 च्या रिलीज डेटमध्ये क्लैशस नको आहेत. सलमान सध्या आपला आगामी प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहे. 'रेस 3'च्या शूटिंगसाठी सध्या तो अबू धाबीमध्ये आहे. सलमान लवकरात लवकर या चित्रपटाची शूटिंग पूर्ण करुन मुंबईत परतणार आहे. त्यानंतर तो 'दबंग 3' वर फोकस करणार आहे.     डीएनएच्या रिपोर्टनुसार सलमान आणि 'रेस 3'ची टीम 4 एप्रिलला मुंबईत परतणार आहे. ज्यानंतर प्रभूदेवा 'दबंग 3'च्या स्क्रिप्टला घेऊन सलमानसोबस मिटिंग करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'दबंग 3'साठी अरबाज खान स्क्रिप्टिंग करतो आहे. आपल्या इंटरव्हु दरम्यान अरबाज खानने सांगितले होती की एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत 'दबंग 3'चे स्क्रिप्ट तयार होणार आहे. ज्यानंतर पुढचा प्लॉन करण्यात येणार आहे. सलमान खान याच महिन्यांपासून चित्रपटाची शूटिंग सुरु करणार असल्याची चर्चा आहे.  दबंग सीरिजचे आधीचे दोन्ही चित्रपट सुपरहिट गेले होते. यात सलमान खानेन साकारलेले चुलबुल पांडेची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. 'दबंग 3'मध्ये चुलबुल पांडेच्या भुतकाळाची गोष्ट दाखवण्यात येणार आहे.  'दबंग 3'चे निर्माता अरबाज खानेन पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, सोनाक्षी सिन्हा 'दबंग 3' चा भाग नसणार आहे. स्क्रिप्टच्या अनुसार कलाकारांची निवड करण्यात येणार आहे.ALSO READ :  WATCH : ​मीडियाच्या शेकडो कॅमे-यांसमोर एकाच कपातून कॉफी पितांना दिसले सलमान खान अन् कॅटरिना कैफ!सलमान 'रेस 3'चे दिग्दर्शन रेमो डिसुझा करणार आहेत. यात सलमानसह जॅकलिन फर्नांडिस, डेजी शहा आणि बॉबी देओल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  या चित्रपटाची निर्मिती रमेश तौराणी करता येत.