Join us

सध्याचा तरुण स्वत:च शोधतोय चांगले संगीत : ए. आर. रहमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 15:05 IST

आपल्या उपजत संगीत गुणांमुळे जगभरातील लोकांची मने जिंकणारे आॅस्कर विजेता संगीतकार ए. आर. रहमान यांचे संगीताबरोबरचे नाते तसेच आहे ...

आपल्या उपजत संगीत गुणांमुळे जगभरातील लोकांची मने जिंकणारे आॅस्कर विजेता संगीतकार ए. आर. रहमान यांचे संगीताबरोबरचे नाते तसेच आहे जसे आत्मा आणि शरीराचे आहे. भारतीय संगीताचा सुगंध आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणारे रहमान स्वत: सुफी संगीताचे दिवाने आहेत. त्यांच्या मते, सुफी संगीत त्यांना शांती आणि आराम देते. विश्वस्तरावर आपल्या संगीताचा लौकिक निर्माण करणारे रहमान १८ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाºया सुफी संगीत कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जगभरात शांती प्रस्थापित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रहमान यांनीच या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, ‘मी या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याच्या विचारानेच मला स्वत:वर अभिमान वाटत आहे. कारण अशाप्रकारचा संगीत समारंभ भारतात गेल्या काही काळापासून झालेला नाही. त्यामुळे या कार्यक्रमाला विविध अर्थाने महत्त्व आहे. मी या कार्यक्रमाच्या आयोजकांना धन्यवाद देऊ इच्छितो की, त्यांनी मला कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिली. रहमान यांच्यासाठी सुफीवाद काय आहे? असे जेव्हा विचारण्यात आले तेव्हा त्यांनी म्हटले की, हे संगीत आत्म्यास शांती देणारे आहे. याच्या माध्यमातून तुम्ही स्वत:ला वेगळ्या दृष्टिकोनातून बघता. आपल्याला सर्वांनाच आध्यात्मिकता आणि प्रेमाची गरज आहे जे सुफीवाद देतो. मी असे मानतो की, हे असे जे आपण सर्वांनी शेअर करायला हवे. कारण सुफी संगीत शांती, स्वातंत्रता आणि विविधतची अभिव्यक्ती आहे.’ सुफी संगीताप्रती तरुणांचा समज आणि त्यांना याकडे आकर्षित करण्याच्या प्रयत्नावर आधारित विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना रहमान म्हणाले की, ‘सध्याचा तरुण खूपच बुद्धिमान आहे. जी आपल्या सर्वांसाठी जमेची बाब आहे. त्यांना जे ऐकायचे आहे, ते ही मंडळी वास्तवात ऐकत आहे. मग ते पारंपरिक संगीत असो वा सुफी. मला असे वाटते की, अधिक शुद्ध आणि पारंपरिक संगीत तरुणांना अधिक आकर्षित करते. त्यामुळेच ते या संगीताचा आनंद घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी म्हटले होते की, रहमान यांच्यावर बायोपिक बनायला हवी. मात्र ही योग्य वेळ नाही. जर बायोपिक बनवायची झाल्यास, त्यामध्ये मुख्य भूमिकेत कोण असेल? हा प्रश्न जेव्हा रहमानला विचारण्यात आला तेव्हा त्यांनी हसून याचे उत्तर दिले, ते म्हणाले की, ‘चांगली गोष्ट आहे. ती खूप चांगली व्यक्ती आहे. ते याकरिता सर्वश्रेष्ठ आहेत. असो, बायोपिकमधील अभिनेत्याविषयी सांगायचे झाल्यास, हे पूर्णत: दिग्दर्शकांवर अवलंबून असल्याचेही त्यांनी सांगितले.