Join us  

Aryan Khan Drugs Case: आर्यन खान प्रकरणावरून कंगनाचा शाहरुखवर थेट निशाणा; जॅकी चॅनचं नाव घेत लगावला टोला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 12:39 PM

'आर्यनची चूक त्याला समजदार बनवण्यास मदत करेल. याचा अर्थ असा नाही, की त्याला त्याच्या चुकांची शिक्षा होऊ नये.'

मुंबई - बॉलिवूडमधील रोखठोक बोलणारी क्विन कंगना रनौतने (Kangana Ranaut) क्रूझ ड्रग्स प्रकरणावरून शाहरुख खानचे (Shahrukh Khan) नाव न घेताच त्याच्यावर थेट निशाणा साधला आहे. कंगनाने सोशल मिडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे आणि सर्व जण तिच्या या पोस्टचा संबंध थेट आर्यन आणि शाहरुख खान यांच्याशी जोडत आहेत. खरे तर, कंगनाने जी पोस्ट शेअर केली आहे, त्यात हॉलिवूड अॅक्टर जॅकी चॅन अपल्या मुलाला ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यानंतर सार्वजनिकपणे माफी मागताना दिसत आहे.

कंगनाने शेअर केली जॅकी चॅनची पोस्ट -कंगनाने ही पोस्ट आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. यात स्पष्टपणे दिसत आहे, की जॅकीने 2014 मध्ये आपला मुलगा जॅसीला ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यानंतर कशा प्रकारे सार्वजनिक माफी मागितली होती. जॅसीला पोलिसांनी बिजिंगमधील त्याच्या अपार्टमेंटमधून 100 ग्रॅम गांजासह अटक केली होती. यानंतर जॅकीने सोशल मिडिया साईटवर लिहिले होते की, 'एक पब्लिक फिगर म्हणून मला लाज वाटत आहे आणि मी अत्यंत दु:खी आहे. त्याची आई देखील दु:खी आहे. मी जॅसीसह जनतेची जाहीरपणे माफी मागतो. ही पोस्ट शेअर करत, 'मी फक्त सांगत आहे,' असे कंगनाने लिहिले आहे.

सर्व माफिया पप्पू आर्यनच्या बचावात... -यापूर्वीही कंनाने आर्यन प्रकरणावर भाष्य केले होते, 'आर्यनची चूक त्याला समजदार बनवण्यास मदत करेल. याचा अर्थ असा नाही, की त्याला त्याच्या चुकांची शिक्षा होऊ नये.' एवढेच नाही, तर 'आता सर्वच माफिया पप्पू एकत्र येऊन आर्यनचा बचाव करतील. चुका सर्वांकडूनच होतात, पण आपण त्यातून काही शिकायला हवे. मला वाटते, कुणी चूक केली असेल, त्याचा बचाव करण्याऐवजी, त्याला चूकच म्हणायला हवे, असे कंगनाने म्हटले होते.

या स्टार्सनी केलाय आर्यनला सपोर्ट -शाहरुख खानच्या मुलाच्या बाजूने अनेक स्टार्समंडळींनी भाष्य केले आहे. यात ऋतिक रोशनचाही समावेश आहे. याशिवाय रवीना टंडन आणि सुजैन खान सारखे कलाकारांनीही आर्यनला सपोर्ट करताना दिसले आहेत.

टॅग्स :कंगना राणौतशाहरुख खानबॉलिवूडआर्यन खान