Join us  

बिग सरप्राईज! कपिल देव यांची लेक अमिया करतेय बॉलिवूड डेब्यू, या सिनेमातून होणार पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 2:32 PM

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याच्या ‘83’ या सिनेमाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. रणवीरच्या या सिनेमाच्या निमित्ताने चाहत्यासाठी एक सरप्राईज बातमी आहे.

ठळक मुद्दे या सिनेमात दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारणार आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याच्या ‘83’ या सिनेमाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. खरे तर गेल्या 10 एप्रिललाच हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे तो रखडला. आता या चित्रपटाबद्दल एक सरप्राईजिंग बातमी आहे.  रणवीरच्या या सिनेमाच्या निमित्ताने चाहत्यासाठी एक सरप्राईज बातमी आहे. होय, या सिनेमातून भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारे कपिल देव यांच्या मुलगी अमिया देव बॉलिवूड डेब्यू करतेय. ‘83’ हा सिनेमा कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमाची असिस्टंट डायरेक्टर म्हणून अमियाने काम केले आहे.  

अमियाचे शिक्षण अमेरिकेत झाल्याने ती सर्वाधिक काळ तिकडेच राहिली आहे. त्यामुळे ती लाइम लाइटपासूनही दूर राहिली. पण या सिनेमाच्या निमित्ताने ती अचानक प्रकाशझोतात आली आहे. 

16 जानेवारी 1196 मध्ये जन्मलेली अमिया क्रिडा जगतापासून दूर बॉलिवूडमध्ये करिअर करण्याची तयारी करत होती. अशात तिला ‘83’च्या निमित्ताने दिग्दर्शक कबीर खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. कबीर खान यांची अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून तिने काम पाहिले.

 कबीर खान दिग्दर्शित ‘83’ या सिनेमाचें शूटिंग पूर्ण झालं असून हा सिनेमा रिलीजसाठी तयार आहे.  या सिनेमात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंह करत आहे.  माजी कर्णधार कपिल देव यांनी या सिनेमासाठी स्वत: रणवीरला ट्रेनिंग   दिले आहे़  ‘83’' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता.

 या सिनेमात दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारणार आहे. लग्नानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा हा पहिला एकत्रित सिनेमा आहे. या चित्रपटात ताहिर राज भसीन सुनील गावस्करांच्या भूमिकेत, एमी ब्रिक बलविंदर संधूंच्या भूमिकेत, तमीळ अभिनेता जीवा कृष्णामचारी श्रीकांत यांच्या भूमिकेत, चिराग पाटील संदीप पाटील यांच्या भूमिकेत, आदिनाथ कोठारे दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत, धैर्य करवा रवी शास्त्री यांच्या भूमिकेत आणि साहिल खट्टर सैयद यांच्या भूमिकेत झळकणार आहे.

टॅग्स :८३ सिनेमारणवीर सिंगकपिल देव