Join us

कृतीचे साहस'दिलवाले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 23:46 IST

'दिलवाले' चित्रपटातील फ्रेश अभिनेत्री कृती सनन हिने नुकतेच कौतुकास्पद असे साहस दाखवले. त्याचे झाले असे, की कृती दिल्लीसाठी विमानप्रवास ...

'दिलवाले' चित्रपटातील फ्रेश अभिनेत्री कृती सनन हिने नुकतेच कौतुकास्पद असे साहस दाखवले. त्याचे झाले असे, की कृती दिल्लीसाठी विमानप्रवास करीत होती. त्यावेळी तिच्या शेजारच्या सीटवर बसलेला माणूस आपल्या आईसोबत आयफोन प्रोजेक्टरद्वारे 'दिलवाले'ची पायरेटेड कॉपी बघत होता. हे पाहून कृतीचा पारा चढला. तिने त्या माणसाला चांगलेच खडसावले. खुद्द कृ तीनेच 'ट्विटर'वर हा किस्सा शेअर केला. सुमारे दीड कोटीचे बजेट असलेल्या या चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिकेत आहे. १0दिवसांआधी रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या पायरेटेड सिडींच्या उपलब्धतेबाबत कृतीने संताप व्यक्त केला. ती म्हणाली, ''अशा प्रकारच्या कृत्यांमुळे मेहनत घेणार्‍या व्यक्तीचे नुकसान होते. लोकांनी चित्रपट गृहांमध्येच 'दिलवाले'बघावा.'' कृतीच्या या ट्विटला ३000 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.