Join us  

CoronaVirus: देशाच्या मदतीला पुढे सरसावले बाजीराव-मस्तानी, म्हणाले- संकटकाळी आपण सगळे आहोत एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 12:08 PM

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी म्हणजे रणवीर दीपिकाही पुढे सरसावले आहेत.

 

संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन जाहीर केले आहे. या वाढत्या प्रकोपासाठी सरकारच्या मदतीसाठी बरेच कलाकार पुढे सरसावले आहेत. यामध्ये बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. या यादीत आता बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी म्हणजेच अभिनेता रणवीर सिंगदीपिका पादुकोण यांच्याही नावाचा समावेश झाला आहे. 

रणवीर सिंगने इंस्टाग्रामवर तो आणि दीपिका पीएम केअर फंड देत असल्याचं सांगितलं आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलं की, सध्याच्या परिस्थितीत छोट्यांहून छोटे प्रयत्न महत्त्वाचा आहे. आम्ही पूर्ण नम्रतेने पीएम केअर फंडमध्ये योगदान देण्याचा संकल्प केला आहे आणि आम्हाला आशा आहे की तुम्हीदेखील तुमचे योगदान द्याल. या संकटकाळी आपण सगळे एकत्र आहोत. जय हिंद. दीपिका आणि रणवीर.

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४९० वर पोहचला आहे. २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाचं संकट वाढताना दिसत आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगकोरोना वायरस बातम्या