Join us  

CoronaVirus: लॉकडाउनमध्येही कोटी रुपये कमवितात तुमचे लाडके सेलिब्रेटी, कसे हे जाणून घेतल्यावर व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 4:23 PM

बंदी व मंदीच्या काळात सिनेइंडस्ट्रीतील काही सेलिब्रेटींची कमाई अद्याप सुरू आहे.

देशातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे कामधंदे, कारखाने आणि शूटिंग, शाळा असं सगळं काही बंद आहेत आणि लोक घरात आहेत. मात्र या बंदी व मंदीच्या काळात सिनेइंडस्ट्रीतील काही सेलिब्रेटींची कमाई अद्याप सुरू आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे. तर यामागचे कारण म्हणजे सोशल मीडिया आणि त्यावर त्यांचे असणारे कोटीच्या संख्येतील फॉलोव्हर्स.  

अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, अभिनेता हृतिक रोशनने त्याच्या सोशल मीडियावर लॉकडाउनला सुरूवात झाल्यावर एक व्हिडिओ शेअर केला होता. यात तो पियानो वाजवताना दिसतो आहे, या व्हिडिओत त्याने आपल्या चाहत्यांना 21 दिवसांचे चॅलेंज घ्यायला सांगितले आहे. तो म्हणाला की, 21 दिवसांच्या लॉकडाउन दरम्यान पियानो शिकण्याचे चॅलेंज घेतले आहे. तुम्हीपण 21 दिवसात काहीतरी नवीन शिकू शकता. आता हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना वाटेल की हृतिकने वास्तविकमध्ये पियानो शिकण्याचे चॅलेंज घेतले आहे.

हृतिकचे आवाहन ऐकून त्याचे चाहते खूप खूश झाले. मात्र यामागचं सत्य हे आहे की या व्हिडिओतून वेदांतु नामक एप्लिकेशनचा प्रचार करण्यात आला आहे. असेच काहीसे हृतिकसोबत टेनिसपटू सानिया मिर्झा, क्रिकेटर शिखर धवन आणि टिकटॉक स्टार जन्नत जुबेर यांनीही केले आहे. या सगळ्यांचे सोशल मीडियावर या सेलिब्रेटींचे कोटी फॉलोव्हर्स आहेत. त्यामुळे त्यांना या बदल्यात मानधन मिळणार आहे.

आता तुम्ही म्हणाल की यात मानधन कुठून आलं? तर सेलिब्रेटींना सोशल मीडियावर कोणतीही प्रमोशनल पोस्ट केल्यावर लाखों, कोटी रुपये मिळतात. त्यांना प्रत्येकी पोस्टच्यानुसार मिळणारे पैसे हे त्यांच्या फॉलोव्हर्स आणि देशातील लोकप्रियतेनुसार वाढते आणि घटते. हृतिक रोशनचे इंस्टाग्रामवर अडीच कोटींहून जास्त आणि ट्विटरवर अडीच कोटी फॉलोव्हर्स आहेत. इतके फॉलोव्हर्स असणाऱ्या कोणत्याही सेलिब्रेटीला एक पोस्ट केल्यावर एक कोटी ते तीन कोटी रुपये आरामात मिळतात.

टॅग्स :हृतिक रोशनसानिया मिर्झाशिखर धवनइन्स्टाग्रामट्विटर