Join us
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : धक्कादायक तब्बल ८ तास चेकअपससाठी ठेवले ताटकळत, या प्रसिद्ध अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 10:48 IST

एकही डॉक्टर त्यांच्या चेकअपसाठी फिरकला नसून त्यांना चेकअपसाठी वाट पाहणे हाच एक पर्याय होता.

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. दिवसागणित यांत रूग्णांची संख्यादेखील वाढत आहेत. अशात खबरदारी म्हणून सारेच लॉक डाऊनचे आदेश पाळत आहे. लवकरात लवकर कोरोनाचे संकट टळावे याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे. तसेच काहीजण स्वतःहून कोरोनाची लक्षणं तर नाही ना याची शहानीशा करण्यासाठी चेकअप करण्यासाठी डॉक्टरांकडे धाव घेत आहेत.

यात एका अभिनेत्रीनेही स्वतःहून चेकअपसाठी गेली असताना चेकअपसाठी तिला तब्बल ८ तास डॉक्टरांची वाट बघावी लागली असल्याचे या अभिनेत्रीने गौप्यस्फोट केला आहे. यात त्यांनी बीएमसीलाच बेजाबदार म्हटले आहे.  ती दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे प्रसिद्ध अभिनेत्री कुनिका लाल. कुणिका लाल या अंधेरीतील लोखंडवाला परिसरात राहतात.

न्यूज 18 इंडियाच्या रिपोर्टनुसार कुनिका शेवटचं दिल्लीला गेल्या होत्या  त्यामुळे ज्यांनी ज्यांनी लांब प्रवास केला आहे. त्यांना  बीएमसीच्या पथकानेचेकअपसाठी बोलवले होते. एका हॉटेलमध्ये त्यांची तपासणी होणार होती. बीएमसीच्या सांगण्यानुसार त्या हॉटेलमध्येदेखील गेल्या.मात्र  काही लोकांना इथं बऱाच वेळ झालं ठेवलं आहे.

मात्र, बीएमसीच्या टीमचं म्हणणं आहे की, डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर घरी सोडलं जाईल. एकही डॉक्टर त्यांच्या चेकअपसाठी फिरकला नसून त्यांना चेकअपसाठी वाट पाहणे हाच एक पर्याय होता. अजून किती वेळ वाट बघणार म्हणून  बीएमसीच्या टीमला वारंवार सांगूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.  बंद हॉटेलमध्ये डॉक्टरांच्या पथकाची वाट बघत असल्याची माहिती त्यांनी दिली.  

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस