Join us  

सैफ अली खानने घेतली कोरोनाची लस, फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 7:58 PM

सैफ अली खानचा लसीकरणादरम्यानचा फोटो सोशल मीडियावर पहायला मिळतो आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन आणि ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर आता अभिनेता सैफ अली खाननेदेखील लस घेतल्याचे समोर आले आहे. सैफ अली खानचा लसीकरणादरम्यानचा फोटो सोशल मीडियावर पहायला मिळतो आहे. 

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने आज कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. सैफ अली खानचा लसीकरणादरम्यानचा फोटो सोशल मीडियावर पहायला मिळतो आहे. 

यावेळी त्याने खाकी रंगाची पँट आणि निळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता आणि तो रांगेत उभा राहून कोरोना लस घेण्यासाठी प्रतिक्षा करत होता.

यापूर्वी लस घेतलेले अभिनेते कमल हासन आणि सतीश शाह यांनी आपला लसीकरणादरम्यानचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. सतीश शाह यांनी सांगितले की, ही लस घेण्यासाठी त्यांना ३ तास उन्हात उभे राहून वाट पाहायला लागली होती. तर कमल हासन यांनी लोकांना लस घेण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, लोकांनी लस घेण्यासाठी लाजू नये. जेव्हा आपली पाळी येईल, त्यावेळी लस टोचून घ्यावी.

सैफ अली खान चौथ्यांदा बाबा झाला आहे. सैफची बायको करीना कपूर हिने काही दिवसांपूर्वी दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. पहिल्या मुलाचा म्हणजेच तैमूरचा जन्म झाला त्यावेळी सैफ व करिना काही दिवसानंतरच कॅमे-यासमोर आले होते. तैमूरची झलक त्यावेळी पहिल्यांदा अख्ख्या जगाने पाहिली होती. पण यावेळी मात्र अद्याप तरी बेबोने आपल्या मुलाला जगापासून लपवून ठेवले आहे. पण ही प्रतीक्षा लवकरच संपेल, असे मानले जात आहे.

सैफ अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तो ‘बंटी और बबली २’, ‘भूत पुलिस’ आणि ‘आदिपुरुष’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. शेवटचा तो तांडव या वेबसीरिजमध्ये पहायला मिळाला होता. 

टॅग्स :सैफ अली खान कोरोनाची लसकमल हासन