‘शेफ’ साठी सैफ गिरवतोय कुकिंगचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 02:29 IST
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा आगामी चित्रपट ‘रंगून’ साठी सैफ अली खान अरूणाचल प्रदेश येथे शूटींग करत आहे. पण सप्टेंबर ...
‘शेफ’ साठी सैफ गिरवतोय कुकिंगचे धडे
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा आगामी चित्रपट ‘रंगून’ साठी सैफ अली खान अरूणाचल प्रदेश येथे शूटींग करत आहे. पण सप्टेंबर महिन्यात तो ‘शेफ’ होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की, असे कसे काय? तर २०१४ मधील अमेरिकन चित्रपट ‘शेफ’ चा रिमेक बनवण्यात येणार आहे. त्यात सैफ अली खान ‘शेफ’ च्या भूमिकेत असणार आहे. लॉस एंजलिस येथे रेस्टॉरंटमध्ये एक प्रोफेशनल शेफ असतो. तो जॉब सोडून मिआमी या त्याच्या गावाकडे जातो. त्याच्या मनातली फुड ट्रक साकारण्याकडे लक्ष देतो. त्याची एक्स गर्लफ्रें ड आणि त्याचा मुलगा मिळून ते कुबानोस विकू लागतात. ही भूमिका जॉन फेव्हरिव्ह्यू याने साकारली आहे. ही भूमिका सैफने करावी असे जॉनला वाटत होते. कारण एकतर तो वडील आहे अणि दुसरे म्हणजे त्याची भूमिका त्यात परफेक्ट बसते. म्हणून सैफने कु किंगचे धडे गिरवण्यास सुरूवात केली आहे.