Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्ट्रोव्हर्सी जरूरी है !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 18:18 IST

 Exculsive - बेनझीर जमादारसध्या बॉलिवुड इंडस्ट्री हे चर्चा आणि वाद यासाठी जास्त प्रसिद्ध होत आहे.    कलाकार,गायक, लेखक ...

 Exculsive - बेनझीर जमादारसध्या बॉलिवुड इंडस्ट्री हे चर्चा आणि वाद यासाठी जास्त प्रसिद्ध होत आहे.    कलाकार,गायक, लेखक आदी लोक सोशलमीडियावर काहीतरी टिवीट करू चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा हा फंडा हिट होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून  हे चित्र  सर्रास पाहायला मिळत आहे. राखी सावंत : आयटम गर्ल राखी सावंत नेहमी काहीना ना काही कारणांसाठी चर्चेत असते. यावेळी तर तिने कहरच केलेला आहे. तिने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेला ड्रेस परिधान केला आहे. या तिच्या ड्रेसमुळे तिला चांगलीच पब्लिसीटी मिळाली आहे.नसिरूद्धिन शहा : काही दिवसांपूर्वीच नसिरूद्धिन शहा यांनी देखील  चर्चेत राहण्यासाठी देखील असेच पाऊल उचलले होते. या कलाकाराने अभिनेता राजेश खन्ना यांच्या अभिनय क्षमतेविषयी मध्यंतरी ट्विीट केले होते. यावर  राजेश खन्ना यांची कन्या ट्विंकल  हिने देखील चोख प्रतिउत्तर दिले होते. ट्विंकल म्हणाली होती, जर तुम्ही जिंवत असलेल्या लोकांचा आदर करू शकत नाही तर हयात नसलेल्या  लोकांचा तरी आदर करा  त्यांच्यावर केल्या जाणाºया टीकांवर ते प्रतित्तर देखील देवू शकत नाही. हा वाद देखील ट्विटर चांगलाच गाजला होता.शोभा डे : लेखिका शोभा डे या देखील चर्चेत राहण्यासाठी काही ना काही ट्वििट करत असतात. तिनेच चक्क यावेळी तर आॅलिम्पिक खेळाडूंवरच आपला निशाणा साधला आहे. आॅलिम्पिकमधील खेळांडूचे प्रोत्साहन वाढवायचे सोडून हिने थेट त्यांच्या कामगिरीवरच टीका केली आहे. शोभा डे यांनी तिच्या ट्विीटमध्ये म्हटले होते की, रियो जाओ, सेल्फी लो और खाली हात आओ तिच्या या ट्विीटमुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. तसेच बॉलीवुड व मराठी कलाकारांनीदेखील  सोशलमिडीयावर त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. सलमान खान : सलमान खानला पाहता, तशी त्याला पब्लिसीटीची गरज नाही. पण  हा बॉलिवुड सुपरस्टार वादात अडकल्याशिवाय राहत नाही. आगामी चित्रपटाचे प्रमोशन असो वा आॅलिम्पिक  खेळाचा वाद असो या खानची चर्चा तर असतेच. सुलतान या चित्रपटाच्या प्रमोशन वेळी देखील सलमान चित्रपटापेक्षा त्याच्या स्टेटमेंट्समुळेच जास्त चर्चेत राहिला. अरिजीत सिंग : अरिजीत सिंग आणि सलमान खान यांचे सोशलमीडिवरील वाद काही संपता संपेना. नुकतेच अरिजीतने सांगितले की, यापुढे मी सलमान खानची माफी मागणार नाही. दोन ते तीन वर्र्षांपासून या दोघांमध्ये हे सोशल युद्ध पेटले आहे. या भांडणामुळे अरिजीत हा नेहमीच चर्चेत राहतो.