Join us
Daily Top 2Weekly Top 5

'राजा शिवाजी'च्या VFX वरुन उलटसुलट चर्चा, अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला- "पूर्णपणे चुकीचे आहे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 13:15 IST

रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर अभिषेक बच्चन शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी यांच्या भूमिकेत दिसत आहे.

रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर अभिषेक बच्चन शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी यांच्या भूमिकेत दिसत आहे. दरम्यान, चित्रपटातील व्हीएफएक्स (VFX) वरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उलटसुलट चर्चा आहेत. या टीकेवर आता अभिषेक बच्चनने सडेतोड उत्तर दिले आहे.

"हॉलिवूडशी तुलना करणे चुकीचे"

'राजा शिवाजी'च्या व्हीएफएक्सवर जी चर्चा होतेय त्यावर उत्तर देताना अभिषेक बच्चनने रितेश आणि जिनिलीयाचं कौतुक केलं. News18 शी बोलताना अभिषेक म्हणाला की, "भारतीय चित्रपटांची तुलना हॉलिवूड चित्रपटांशी करणे पूर्णपणे चुकीचे आहे, कारण दोघांच्या बजेटमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो. लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की, रितेश आणि जिनिलीया यांनी एका मर्यादित बजेटमध्ये हा मराठी चित्रपट बनवला आहे."

अभिषेकने पुढे तांत्रिक बाजू स्पष्ट केली. तो म्हणाला, "कदाचित सामान्य माणसाला हे माहित नसेल, पण व्हीएफएक्स ही एक अतिशय बारकाईने करण्यासारखी कला आहे. तुम्ही या कामाला जितका जास्त वेळ द्याल आणि जितका जास्त पैसा खर्च कराल, तितकी त्याची गुणवत्ता सुधारते. कमी वेळेत आणि मर्यादित साधनांमध्ये काम करणे हे एक मोठे आव्हान असते."

अभिषेकने पुढे असेही नमूद केले की, हॉलिवूडमधील मोठे स्टुडिओ केवळ व्हीएफएक्सवर ५००० कोटी रुपयांहून अधिक खर्च करतात. त्या तुलनेत भारतीय चित्रपट सृष्टीतील व्हीएफएक्सचे बजेट हे हॉलिवूडच्या बजेटच्या एक टक्काही नसते. त्यामुळे आपण त्या स्तरावर स्पर्धा करू शकत नाही, कारण आपली बाजारपेठ वेगळी आहे. अशाप्रकारे अभिषेकने रितेश-जिनिलीयाचं कौतुक करुन 'राजा शिवाजी'मधील VFX चं समर्थन केलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Abhishek Bachchan defends 'Raja Shivaji' VFX amidst criticism.

Web Summary : Abhishek Bachchan defended 'Raja Shivaji's VFX, stating comparing it to Hollywood is unfair due to budget differences. He praised Riteish Deshmukh and Genelia for their efforts within limitations, emphasizing that VFX quality depends on time and money invested.
टॅग्स :राजा शिवाजी चित्रपटरितेश देशमुखअभिषेक बच्चन