Join us

Confirm : प्रेग्नंट आहे सोहा अली खान; पतौडी परिवारात पुन्हा येणार आनंदाचे क्षण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2017 21:34 IST

सध्या पतौडी परिवारात जणू काही आनंदाचे क्षण ठाण मांडून बसलेले आहेत. कारण सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा ...

सध्या पतौडी परिवारात जणू काही आनंदाचे क्षण ठाण मांडून बसलेले आहेत. कारण सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूरच्या जन्मानंतर पुन्हा एकदा एक चिमुकला पाहुणा पतौडी परिवारात येणार आहे. होय, आम्ही सोहा अली खान हिच्याविषयी बोलत असून, लवकरच ती आई होणार आहे. या वृत्तास तिचा पती कुणाल खेमू याने दुजोरा दिला असून, सोहा प्रेग्नंट असल्याचे आता कन्फर्म झाले आहे. शिवाय कुणालने हे आमचे पहिले-वहिले ज्वाइंट प्रॉडक्शन असल्याचेही म्हटले आहे. कुणाल खेमूने बोलताना म्हटले की, ‘मी आणि सोहा या गोष्टीचा खुलासा करू इच्छितो की, लवकरच आमच्या घरात एक चिमुकला पाहुणा येणार आहे; मात्र त्याने डिलिव्हरी कधी होणार याबाबचा कुठलाही खुलासा केला नाही. गेल्या काही दिवसांपासून सैफ अली खान आणि कुणाल खेमू चर्चेत होते. असे बोलले जात होते की, दोघांमध्ये वाद सुरू असून, लवकरच हे दोघे घटस्फोट घेणार आहेत; मात्र आता सोहा प्रेग्नंट असल्याची बातमी समोर आल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. त्याचबरोबर हेही स्पष्ट होते की, सोहा आणि कुणाल यांच्या करिअरची गाडी भलेही धिम्या गतीने चालत असली तरी, त्याच्या पर्सनल लाइफमध्ये हे दोघेही खूश आहेत. सोहा आणि कुणाल गेल्यावर्षी २५ जानेवारी रोजी विवाहाच्या बंधनात अडकले होते. मुंबई येथील खार स्थित घरी रजिस्ट्रार आणि नातेवाइकांच्या उपस्थितीत हे जोडपे विवाहबंधनात अडकले होते. सोहाचा भाऊ सैफ अली खान, वहिनी करिना कपूर आणि आई शर्मिला टागोर यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या विवाहास उपस्थित होते. लग्नाअगोदर हे जोडपे तब्बल दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांची भेट २००९ मध्ये आलेल्या ‘ढूॅँढते रह जाओंगे’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर हे दोघे लग्नाच्या बंधनात अडकले. आता या दोघांच्या आयुष्यात एक पाहुणा येणार असल्याने पुन्हा एकदा पतौडी परिवारात आनंदाचे क्षण येणार आहेत.