सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री पूजा हेगडे हिच्या नावाचा सध्या विचार केला जात आहे. काही काळापूर्वी पूजाला हृतिक रोशनबरोबर ‘मोहनजोदाडो’ या चित्रपटात प्रेक्षकांनी बघितले होते. आता पूजा ‘साहो’मध्ये प्रभाससोबत रोमान्स करताना दिसणार आहे. वास्तविक अद्यापपर्यंत पूजाच्या नावाची अधिकृत घोषणा केली गेली नाही; मात्र निर्माते पूजाच्या नावावर विचार करीत असल्याचे निश्चित आहे. जर पूजाला या चित्रपटात संधी दिल्यास पहिल्यांदा पूजा आणि हृतिकची जोडी पडद्यावर बघावयास मिळणार आहे.
वृत्तानुसार प्रभास या चित्रपटाच्या शूटिंगला आॅगस्ट महिन्यापासून सुरुवात करणार आहे. असे म्हटले जात आहे की, ‘साहो’ हा चित्रपट वर्तमानकाळापेक्षा तांत्रिक प्रगल्भ असेल. ज्यामध्ये प्रेक्षकांना अनेक आश्चर्यचकित करणाºया गोष्टी बघावयास मिळू शकतात. चित्रपटात प्रभास व्यतिरिक्त बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार नील नितीन मुकेश आणि चंकी पांडे यांच्या प्रमुख भूमिका असतील.
दरम्यान, पूजाचे नाव जर निश्चित झाले तर ती अनुष्काची जागा घेण्यास योग्य ठरेल काय? प्रेक्षक अनुष्काऐवजी पूजाला पसंत करतील काय? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे. पण काहीही असो, पूजा हेगडेचा आतापर्यंतचा प्रवास पाहता ती या चित्रपटाला न्याय देऊ शकेल, असे म्हटले तर घाईचे ठरू नये.