पत्नीला इंप्रेस करण्यासाठी ‘सुलतान’चा संपूर्ण शो बुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 16:36 IST
ईदच्या मुहूर्तावर सलमानचा प्रदर्शित झालेल्या ‘सुलतान’न पहिल्याच दिवशी बॉक्स आॅफिसवर ३६.५४ कोटींंची कमाई केली. तसे सलमानचे फॅन जगभरात मोठ्याप्रमाणावर ...
पत्नीला इंप्रेस करण्यासाठी ‘सुलतान’चा संपूर्ण शो बुक
ईदच्या मुहूर्तावर सलमानचा प्रदर्शित झालेल्या ‘सुलतान’न पहिल्याच दिवशी बॉक्स आॅफिसवर ३६.५४ कोटींंची कमाई केली. तसे सलमानचे फॅन जगभरात मोठ्याप्रमाणावर आहेत. हे फॅन्स सलमानसाठी काहीही करायला तयार असतात, अशीच एक घटना हिमाचल प्रदेशच्या हमीरपूरमध्ये घडली. शंकर मुसाफिर यांची पत्नी सलमानची मोठी चाहती आहे. आपल्या पत्नीला इंप्रेस करण्यासाठी या पठ्ठ्याने चक्क संपूर्ण सिनेमाहॉलच बुक केला. त्याने संपूर्ण शो बुक करत पत्नीला चांगलेच सरप्राईज दिले.