रणवीरच्या या ड्रेसला आल्या अशा कमेंट्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 16:19 IST
रणवीर सिंग बॉलिवूडमध्ये नेहमीच त्याच्या अलग अंदाजामुळे ओळखला जातो. मनाला जे वाटेल ते बिनधास्तपणे करण्याची रणवीरची सवयच आहे. बॉलिवूडमध्ये ...
रणवीरच्या या ड्रेसला आल्या अशा कमेंट्स...
रणवीर सिंग बॉलिवूडमध्ये नेहमीच त्याच्या अलग अंदाजामुळे ओळखला जातो. मनाला जे वाटेल ते बिनधास्तपणे करण्याची रणवीरची सवयच आहे. बॉलिवूडमध्ये आज अव्वल स्थानी असताना देखील त्याला कशाचीच पर्वा नसल्यचो पाहायला मिळते. रणवीरचा हा डॅशिंग अंदाज कधी कधी चर्चेचा विषय देखील बनतो. नुकताच तो एका पार्टीमध्ये दीपिकाच्या हातात हात घालुन बिनधास्त फिरताना दिसला होता. तर आता तो जास्तच 'बेफिक्रे' अंदाजात दिसतोय. मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी आलेल्या रणवीरच्या ड्रेसने अनेकांचे लक्ष वेधले. रणवीरने खूप विचित्र कपडे घातले होते. त्याने नेमके काय घातले हे कुणालाच समजत नव्हते. अनेकांनी त्याला गराडा घातला आणि त्याच्याबरोबर सेल्फी घेतल्या. त्यानेही आनंदाने आपल्या फॅन्सबरोबर फोटो काढले. काही वेळाने मात्र त्याच्या या ड्रेसची चर्चा सोशल मीडियावर वेगाने शेअर होऊ लागली. त्याचे या ड्रेसवरील फोटो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि सुरू झाल्या अनेकांच्या फनी कमेंट...रणवीरकडे टेलरला द्यायला रोख पैसे नव्हते. त्याच्या जवळच्या एटीएममध्येही कॅश शिल्लक नव्हती. माझे फरशी पुसायचे फडके सापडत नाही... कुणाला ते सापडले का? कदाचित रणवीरने दीपिकाच्या कपाटात हात घालून तिचा ड्रेस तर घातला नाही ना? या ड्रेसला माहीत होते का त्याचे काय हाल होईल? शाळेतील बेस्ट आॅफ वेस्ट' स्पधेर्तील विजेता. एटीएमच्या रांगेतून आलेला रणवीर सिंह. वेश बदलून बँकेतील महिलांच्या रांगेत उभ्या असणाºया रणवीरला पोलिसांनी पकडले, तो क्षण. टेक्सटाइल मिनिस्ट्री स्मृती इराणीच्या आखत्यारीत आल्यानंतरची फॅशन... एका फॅनने दीपिकाची छेड काढल्यानंतर रणवीरचे आणि फॅनच्या मारामाºया झाल्या. त्यानंतरचा अवतार.