Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ कॉमेडी शोच्या सेटवर भडकला अक्षय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 20:43 IST

‘कॉमेडी नाईट्स बचाओ’च्या सेटवर अक्षय कुमार जाम भडकला. त्याच्या भडकण्यामागचे कारणही तितकेच गंभीर होते. या शोमध्ये अक्षय, रितेश देशमुख, ...

‘कॉमेडी नाईट्स बचाओ’च्या सेटवर अक्षय कुमार जाम भडकला. त्याच्या भडकण्यामागचे कारणही तितकेच गंभीर होते. या शोमध्ये अक्षय, रितेश देशमुख, लीजा हेडन व जॅकलीन फर्नांडिस हाऊसफुल-३च्या प्रमोशनसाठी आले होते. यादरम्यान विनोदी अभिनेता सिद्धार्थ जाधव याचा अ‍ॅक्ट पाहून अक्षय जाम भडकला. सिद्धार्थने लीजाबद्दल वांशिक टीप्पणी केली. अक्षयला ती प्रचंड खटकली. लीजा ही आॅस्ट्रेलियाची आहे. त्यामुळे जाधव लीजासोबत कांगारूंबद्दल बोलायला लागला. त्याच्याही आधी सिद्धार्थने लीजाला ब्लॅक आॅफ्रिकन असे संबोधले. अक्षयला हे असहय्य झाले आणि त्याने सिद्धार्थला मधेच रोखले. एवढेच नव्हे तर अक्षयने त्याला जोरदार धक्का दिला यामुळे सिद्धार्थ स्टेजपासून दूर जावून पडला.