Join us
Daily Top 2Weekly Top 5

​लवकरच येतेयं, ‘लेडिज रूम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 16:50 IST

वेब सिरीजच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करणाºया यशराज फिल्मने (वायआरएफ) आता एक अनोख्या प्रोजेक्टवर काम चालवले आहे. वायआरएफ लवकरच ‘लेडिज ...

वेब सिरीजच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करणाºया यशराज फिल्मने (वायआरएफ) आता एक अनोख्या प्रोजेक्टवर काम चालवले आहे. वायआरएफ लवकरच ‘लेडिज रूम’नामक वेबसीरिज घेऊन येतोय. ‘लेडिज रूम’ ही दोन जिवलग मैत्रिणींची कहाणी आहे. सहा वेगवेगळ्या लेडिज वॉशरूमध्ये या दोघींना वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, त्याचीच ही कथा आहे. डिंगो आणि खन्ना अशा या दोन मुली एकापाठोपाठ एक अशा संकटात सापडतात आणि त्यांना पुरून उरतात, अशी ही कथा आहे. सबा आझाद हिने ‘लेडिज रूम’मध्ये डिंगोची व्यक्तिरेखा साकारली आहे तर श्रेया धनवन्तरी ही खन्नाच्या भूमिकेत आहे.ही कॉमेडी फिक्शनल वेब सीरिज येत्या मेमध्ये रिलित होणार आहे.