Join us
Daily Top 2Weekly Top 5

१४ वर्षांनी येतोय सुपरहिट 'कॉकटेल'चा सीक्वल! 'कॉकटेल २'मध्ये दिसणार रश्मिका-शाहिद-क्रितीचं त्रिकुट, पोस्टर रिलीज

By कोमल खांबे | Updated: April 2, 2026 09:01 IST

'कॉकटेल' या सुपरहिट ठरलेल्या बॉलिवूड सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'कॉकटेल २'ची नुकतीच घोषणा करण्यात आली असून याचं नवं पोस्टरही समोर आलं आहे.

'कॉकटेल' या सुपरहिट ठरलेल्या बॉलिवूड सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'कॉकटेल २'ची नुकतीच घोषणा करण्यात आली असून याचं नवं पोस्टरही समोर आलं आहे. दीपिका पादुकोण, सैफ अली खान आणि डायना पेंटी हा लव्ह ट्रँगल 'कॉकटेल'मध्ये दिसला होता. आता 'कॉकटेल २'मधून नवं त्रिकुट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कॉकटेल २'मध्ये शाहिद कपूर, रश्मिका मंदाना आणि क्रिती सेनॉन दिसणार आहेत. या सिनेमाच्या पोस्टरने लक्ष वेधून घेतलं आहे. 

'कॉकटेल २' सिनेमाच्या रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये शाहिद, रश्मिका आणि क्रिती एका समुद्रकिनारी गाडीत बसल्याचं दिसत आहेत. हे पोस्टर शेअर करत रश्मिकाने सिनेमाची रिलीज डेटही सांगितली आहे. यासोबतच सिनेमातील पहिलं गाणंही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्यांदाच रश्मिका, शाहिद आणि क्रितीची जोडी जमली आहे. त्यामुळे त्यांना सिनेमात ऑनस्क्रीन एकत्र पाहण्यासाठी चाहतेही तितकेच उत्सुक आहेत. 

२०१२ साली 'कॉकटेल' सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमातील गाणीही प्रचंड हिट झाली होती. आता तब्बल १४ वर्षांनी या सिनेमाचा सीक्वल येतो आहे. 'कॉकटेल २'मधलं पहिलं गाणं लवकरच प्रदर्शित केलं जाणार आहे. जब तलक हे गाणं येत्या ८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 'कॉकटेल २' हा सिनेमा १९ जून २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Cocktail sequel after 14 years! Rashmika, Shahid, Kriti star.

Web Summary : The sequel to the hit film 'Cocktail' is coming! 'Cocktail 2' stars Shahid Kapoor, Rashmika Mandanna, and Kriti Sanon. The first song releases April 8th, and the film on June 19, 2026.
टॅग्स :रश्मिका मंदानाशाहिद कपूरक्रिती सनॉन