Join us

'लुका छुपी'मधील नवे गाणे 'कोका कोला तू' प्रदर्शित; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 20:40 IST

बॉलिवूडचा हॅण्डसम हंक कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांची मुख्य भूमिका असलेला 'लुका छुपी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्देक्रिती कार्तिकचा हा रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा येत्या १ मार्चला होणार प्रदर्शित

बॉलिवूडचा हॅण्डसम हंक कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांची मुख्य भूमिका असलेला 'लुका छुपी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून यात कार्तिक आणि क्रिती यांच्या रोमँटिक कॉमेडीमध्ये त्यांच्या लग्नाची मनोरंजक कथा दाखवण्यात आली आहे. आता नुकतेच या चित्रपटातील 'कोका कोला तू' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या गाण्याची लिंक ट्विटरवर शेअर केली आहे. 'कोका कोला तू' असे शीर्षक असलेल्या या गाण्यात क्रिती सेनन आणि कार्तिक आर्यनचा धमाल डान्स पाहायला मिळत आहे. हे एक पार्टी साँग असून गाण्याला नेहा कक्कर, तनिष्क बागची आणि टोनी कक्कर यांनी आवाज दिला आहे. या गाण्याला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

दिनेश विजान निर्मित हा चित्रपट सिनेमेट्रोग्राफर लक्ष्मण उतेकरने दिग्दर्शित केला आहे. क्रिती व कार्तिकशिवाय अपारशक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी, विनय पाठक यात महत्त्वपूर्ण भूमिका वठवताना दिसणार आहे.

क्रिती कार्तिकचा हा रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा येत्या १ मार्चला प्रदर्शित होतोय. याच दिवशी सुशांत सिंग राजपूतचा ‘सोन चिरैया’ आणि अर्जुन कपूर व परिणीती चोप्राचा ‘संदीप और पिंकी फरार’ हे दोन चित्रपट रिलीज होत आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यनक्रिती सनॉन