शाहरूखच्या या गाण्यावर अहान चांगलाच एन्जॉय करताना बघावयास मिळत आहे. पूर्ण एनर्जीसह तो डान्स करीत आहे. अहानचा डान्स बघून असे दिसत आहे की, त्याची मैत्रीण सुहानाच्या डॅडचा प्रचंड मोठा चाहता आहे. या व्हिडीओमध्ये अहानसोबत त्याची बहीणही डान्स करताना दिसत आहे. चंकी पांडेचे पुतणे अहान आणि अलाना यांनी काही दिवसांपूर्वीच एक फोटोशूट केले होते. ज्यामध्ये दोघांचा अंदाज खूपच जबरदस्त होता. या फोटोशूटमध्ये अहान-अलाना व्यतिरिक्त सुनील शेट्टीच्या मुलाची गर्लफ्रेंड तान्या श्रॉफ आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप बघावयास मिळत होते.
हे फोटोशूट त्यांनी एका फॅशन मॅगझिनसाठी केले होते. ज्यामध्ये सर्व स्टार किड्स खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत होते. सर्व स्टारकिड्स एक फोटो मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकला. तर अहान-अलाना फोटोमध्ये अतिशय डिफरेंड लूकमध्ये बघावयास मिळाले. यातील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावरही पोस्ट केले.