Join us
Daily Top 2Weekly Top 5

'चौदवीं का चांद', 'साहिब बीवी और गुलाम' फेम अभिनेत्री मीनू मुमताज यांचे कॅनडात निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 14:51 IST

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री मीनू मुमताज यांनी कॅनडामध्ये अखेरचा श्वास घेतला.

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री मीनू मुमताज यांचे आज २३ ऑक्टोबरला निधन झाले आहे. त्यांनी कॅनडामध्ये अखेरचा श्वास घेतला. मुमताज यांच्या भावाने त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या भावाचे नाव अनवर अली असे आहे. मीनू मुमताज यांच्या भावाने बहिणीच्या निधनाची बातमी देत सिनेइंडस्ट्री, मीडिया आणि त्यांच्या चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार देखील मानले आहेत. मीनू मुमताज या बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदवीर महमूद अली यांच्या बहिण आहेत. 

मुमताज यांनी अनेक हिंदी चित्रपटात महत्त्वाची भूमिका केल्या आहेत. १९५० ते १९६० च्या दशकात त्यांनी बॉलिवूडवर राज्य केले आहे. मुमताज फक्त एक अभिनेत्री नव्हत्या तर त्या प्रसिद्ध डान्सर देखील होत्या. मीनू यांनी त्यांच्या करियरची सुरूवात डान्सर म्हणून केली होती.  त्यानंतर पन्नासच्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये डान्सर म्हणून काम केले.

'सखी हातिम' हा त्यांचा पहिला चित्रपट

'सखी हातिम' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्या बलराज साहनीसोबत मुख्य भूमिकेत होत्या. मीनू मुमताज गुरु दत्त यांच्या अनेक चित्रपटांमध्ये देखील झळकल्या होत्या. मुमताज यांनी 'वे कागज का  फूल', 'चौदवीं का चांद', 'साहिब बीवी और गुलाम', 'ताजमहल', 'घूंघट', 'इंसान जाग उठा', 'घर बसाके देखो', 'गजल'  यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे.