Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता व  कोरिओग्राफर पुनीत पाठकच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, या दिवशी चढणार बोहल्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 15:15 IST

निधी मनी सिंहसोबत बांधणार लग्नगाठ

ठळक मुद्देपुनीत फिल्म इंडस्ट्रीतील मोठा कोरिओग्राफर आहे. अभिनेता अशीही त्याची ओळख आहे. पुनीत ‘खतरों के खिलाडी 9’चा विनर होता.

अलीकडे बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर लग्नबेडीत अडकली, पाठोपाठ सिंगर व होस्ट आदित्य नारायण बोहल्यावर चढला. आता मनोरंजन इंडस्ट्रीत आणखी एका लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. होय, कोरिओग्राफर व अभिनेता पुनीत पाठक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. निधी मनी सिंहसोबत पुनीत लग्नगाठ बांधणार आहे.

या लग्नासाठी येत्या 11 तारखेचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. खुद्द पुनीतने सोशल मीडियावर वेडिंग डेट जाहिर केली आहे. ‘आता ही तारीख नेहमीसाठी आमच्यासोबत असेन. या तारखेला खूप काही बदलणार आहे. 11 डिसेंबर 2020 रोजी आमच्या आयुष्याचा नवा चॅप्टर सुरु होईल. हा माझ्या व तुझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर चॅप्टर असेन,’ असे लग्नाची तारीख शेअर करताना त्याने लिहिले आहे.

पुनीतची भावी वधू निधीनेही लग्नाची तारीख शेअर केली आहे. लोणावळ्यात पुनीत व निधीचा लग्नसोहळा होणार आहे. गेल्या 26 ऑगस्टला पुनीत व निधीचा साखरपुडा झाला होता. या साखरपुड्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

पुनीत फिल्म इंडस्ट्रीतील मोठा कोरिओग्राफर आहे. अभिनेता अशीही त्याची ओळख आहे. पुनीत ‘खतरों के खिलाडी 9’चा विनर होता. एबीसीडी, नवाबजादे अशा सिनेमात त्याने काम केले आहे. ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या सिनेमातही तो झळकला.

टॅग्स :पुनित पाठक