सलमान खानने या अभिनेत्याला दिला होता चोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 17:45 IST
सलमान खान आणि रणबीर कपूर या दोघांचेही कतरिना कैफसोबत अफेअर होते. कतरिना कैफ इंडस्ट्रीत आल्यानंतर सलमानने तिला खूप मदत ...
सलमान खानने या अभिनेत्याला दिला होता चोप
सलमान खान आणि रणबीर कपूर या दोघांचेही कतरिना कैफसोबत अफेअर होते. कतरिना कैफ इंडस्ट्रीत आल्यानंतर सलमानने तिला खूप मदत केली. तिने सुरुवातीच्या काळात सलमानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्याच दरम्यान तिच्यात आणि सलमानमध्ये अफेअर सुरू झाले होते. सलमानच्या प्रत्येक समस्येत ती त्याच्या पाठिशी उभी असायची. पण त्यांच्यात काहीतरी बिनसले आणि त्या दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर काहीच महिन्यात कतरिना रणबीरच्या प्रेमात पडली. रणबीरसोबत ती अनेक पार्टयां मध्ये, सार्वजनिक ठिकाणी देखील दिसत असे. त्यामुळे आता हे लग्न करतील असे वाटत असतानाच त्या दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. रणबीर कपूर आणि सलमान खान हे कतरिनाचे पूर्वप्रियकर असून यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून कोल्ड वॉर सुरू आहे. पण तुम्हाला माहीत आहे का या कोल्ड वॉरसाठी कतरिना जबाबदार नाहीये. रणबीर इंडस्ट्रीत यायच्या कित्येक वर्षं आधीपासूनच हे कोल्ड वॉर सुरू आहे. रणबीर कपूर हा प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर आणि नितू सिंग यांचा मुलगा आहे. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सलमान आणि रणबीरची भांडणे झाली होती. सलमान आणि रणबीर खूप वर्षांपूर्वी एकाच पबमध्ये गेले होते. त्यावेळी कोणत्या तरी गोष्टीवरून त्यांच्यात वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की सलमानने रणबीरला चांगलेच चोपले होते. रणबीरचे कपडे देखील फाडले होते. रणबीरला हा प्रकार अतिशय लाजीरवाणा वाटला असल्याने तो तिथून लगेचच निघून गेला होता. सलमानला त्यानंतर त्याची चूक चांगलीच उमगली होती आणि त्याच्या कृत्यासाठी त्याने रणबीरकडे माफी देखील मागितली होती. एवढेच नव्हे तर हाणामारीच्या वेळी रणबीरचे कपडे फाटले होते. त्यामुळे सलमानने त्याला कित्येक शर्ट गिफ्ट म्हणून दिले होते. सलमान आणि रणबीरचे वडील ऋषी कपूर या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये खूप चांगले नाते आहे. त्यामुळे सलमानने ही भांडणं न वाढवता रणबीरची माफी मागितली होती. Also Read : भाईजानचा ‘दिवाळी धमाका’! ‘टायगर जिंदा है’चे पहिले पोस्टर जारी करत दिली दिवाळी भेट!!