चिरंजीवी परतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 13:34 IST
तेलगु फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार चिरंजीवी गेली आठ वर्षं चित्रपटांपासून दूर आहे. चिरंजीवीने २००७ला शंकर दादा जिंदाबाद या चित्रपटात काम ...
चिरंजीवी परतला
तेलगु फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार चिरंजीवी गेली आठ वर्षं चित्रपटांपासून दूर आहे. चिरंजीवीने २००७ला शंकर दादा जिंदाबाद या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटाचा रिमेक होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. गेल्या काही वर्षांत चिरंजीवी राजकारणात सक्रिय झाला होता. राजकारणात व्यग्र असल्याने त्याने अभिनयाला रामराठ ठोकला होता. पण आता कित्येक वर्षांनी तो काथिलानटोडू या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दृश्याचे चित्रीकरण नुकतेच हैद्राबाद येथे झाले. विशेष म्हणजे काथिलानटोडू हा चिंरजीवीचा १५०वा चित्रपट आहे.