Join us

‘मुलांना देणार ऊन-सावलीची जाणीव’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2016 15:47 IST

 जेनेलिया देशमुख ही तिचे आत्तापर्यंतचे आयुष्य तिच्या स्वत:च्या विचार आणि नियमांवर जगली. आता ती दोन मुलांची आई झाली असून ...

 जेनेलिया देशमुख ही तिचे आत्तापर्यंतचे आयुष्य तिच्या स्वत:च्या विचार आणि नियमांवर जगली. आता ती दोन मुलांची आई झाली असून सध्या ती तिचे आईपण मस्त एन्जॉय करतेय. तिच्या मुलांच्या जडणघडणीविषयी बोलतांना म्हणते,‘माझ्या रिआन आणि राहिल या दोन्ही मुलांनी माझं आयुष्यंच पालटून टाकलं.मी त्यांना आयुष्यातील चढऊतार आणि श्रीमंती- गरीबी या दोन्ही गोष्टींची ओळख करून देणार आहे. त्यांना शहरी भाग आणि ग्रामीण भाग, येथील लोकांची जाणीव असणे गरजेचे आहे. तसेच मला त्यांच्यासोबत आईपेक्षाही मैत्रीण म्हणून राहायला जास्त आवडते. घराबाहेर खेळण्याचे सर्व खेळ मी त्यांच्यासोबत खेळते.’