Join us

चीची म्हणतो,‘रणवीर सर्वांत बेस्ट अभिनेता’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 13:10 IST

९० च्या दशकातील बॉलीवूडचा सर्वांत चांगला डान्सर आणि अभिनेता म्हणून ओळखला जाणारा गोविंदा आता म्हणतोय की, सध्या बॉलीवूडमध्ये असणाऱ्या अभिनेत्यांपैकी ...

९० च्या दशकातील बॉलीवूडचा सर्वांत चांगला डान्सर आणि अभिनेता म्हणून ओळखला जाणारा गोविंदा आता म्हणतोय की, सध्या बॉलीवूडमध्ये असणाऱ्या अभिनेत्यांपैकी रणवीर सिंग हा अभिनेताच सर्वांत बेस्ट अभिनेता आहे. तो म्हणतो,‘ सध्या बॉलीवूडमध्ये जे हिरो टॉपवर आहेत त्यांच्यापैकी रणवीर हा अभिनेताच मला जास्त आवडतो. तो अतिशय मेहनती आहे.त्यानंतर अक्षय कुमार हा देखील बॉलीवूडमध्ये खुप कष्टाळू आहे. मला वाटतं की, त्यांनी चित्रपट निवडला की ते त्यात रममाण होऊन जातात. ते कॅरेक्टर जगतात. इतर तरूण पिढीने चित्रपट निवडलेत पण ते काम योग्य पद्धतीने करत नाहीयेत.सध्या फक्त किती अ‍ॅब्ज आहेत यावरच बोलले जाते. केवळ ‘चूसे हूए आम जैसे लगते हैं उनके चेहरे’ दिसतात. मला एकही क लाकार धर्मेंद्रप्रमाणे दिसत नाही.