Join us

'छावा' फेम अभिनेत्याला पुत्ररत्न, घरी झालं चिमुकल्याचं आगमन

By कोमल खांबे | Updated: July 27, 2025 13:29 IST

लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेता बाबा झाला आहे. अभिनेत्याला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे.

विकी कौशलच्या 'छावा' सिनेमातील अभिनेत्याने गुडन्यूज दिली आहे. लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेता बाबा झाला आहे. अभिनेत्याला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. 'छावा' सिनेमात कवी कलशची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता विनीत कुमार सिंग बाबा झाला आहे. विनितच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

"देवायी माया ओसंडून वाहते...घरी छोट्या सिंगचं आगमन झालं आहे. त्याने आताच आमचं हृदय आणि दुधाच्या बाटल्या चोरायला सुरुवात केली आहे. यासाठी देवाचे आभार मानतो", असं म्हणत विनीत कुमार सिंगने पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

विनीत आणि त्याची पत्नी रुचिरा या दोघांनी २०२१ मध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. काही दिवसांपूर्वीच आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली होती. लग्नाच्या ४ वर्षांनी विनीत आणि रुचिरा आईबाबा झाल्याने दोघेही आनंदी आहेत. 

टॅग्स :'छावा' चित्रपटसेलिब्रिटी