Join us

Video: 'छावा' सिनेमातून काढून टाकलेला 'तो' सीन आला समोर; नेटकऱ्यांनी केलं कौतुक, बघा व्हिडीओ

By देवेंद्र जाधव | Updated: August 20, 2025 17:30 IST

'छावा' सिनेमातील डिलीट झालेला एक सीन तुफान व्हायरल झालाय. बातमीवर क्लिक करुन हा सीन बघितल्यावर तुम्हालाही आनंद मिळेल.

१४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेला 'छावा' सिनेमा चांगलाच गाजला. विकी कौशलने सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. 'छावा' सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी झाली होती. सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. 'छावा' सिनेमाच्या रिलीजआधी काही दृश्यांमुळे चांगलेच वाद निर्माण झाले होते. त्यामुळे दिग्दर्शकाला ते प्रसंग सिनेमातून काढावे लागले होते. आता 'छावा'मधील असाच एक डिलीट झालेला प्रसंग समोर आला आहे.

'छावा'मधील काढलेला तो सीन

१७ ऑगस्टला 'छावा' सिनेमाचा टेलिव्हिजवर वर्ल्ड प्रीमिअर झाला. त्यावेळी सिनेमातील अनेक डिलीट झालेले सीन प्रेक्षकांना बघता आले. यापैकी असाच एक छोटासा सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये दिसतं की, छत्रपती संभाजी महाराज हातात तलवार घेऊन औरंगजेबासमोर उभे असतात. औरंगजेब शंभूराजांकडे निरखून बघत असतो. "मला पकडायला तू आला नाहीयेस. मीच तुला इथे बोलावलंय. कारण तू त्या गादीवर बसण्याच्या लायक नाहीस", असं शंभूराजे औरंगजेबाला सांगतात. पुढे शंभूराजे तलवारीने औरंगजेबाला मारतात. तेवढ्यात औरंगजेब घाबरुन झोपेतून जागा होतो. कारण हे एक स्वप्न असतं.

हा सीन पाहताच अनेकांनी याचं कौतुक केलंय. हा सीन सिनेमात ठेवायला पाहिजे होता, अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी विकी कौशल आणि अक्षय खन्नाच्या अभिनयाचं कौतुक केलंय. 'छावा' सिनेमाबद्दल सांगायचं तर सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची, अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली होती. याशिवाय सिनेमात संतोष जुवेकर, आस्ताद काळे, शुभंकर एकबोटे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये सारखे मराठी कलाकारही झळकले होते.

टॅग्स :'छावा' चित्रपटविकी कौशलरश्मिका मंदानाअक्षय खन्नासंतोष जुवेकर