Join us  

फोटोतल्या या क्युट मुलाला ओळखलंत का? आज बॉलिवूडवर गाजवतोय राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 4:28 PM

फोटोंमध्ये दिसणारा हा गोड, निरागस चेहऱ्याचा लहान मुलगा आज बॉलिवूडवर राज्य करत आहे.  

सेलिब्रिटींच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. अनेक लोक या फोटोंवरून कलाकार कोण? हे ओळखण्याचा प्रयत्न करत असतात यामध्येच आता एका लोकप्रिय अभिनेत्याचा फोटो चर्चेत येत आहे. फोटोमध्ये दिसणारा मुलगा केवळ बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांपैकी एक नाही, तर त्याला  ग्लोबल स्टार देखील म्हटले जाते. 

सोशल मीडिया स्क्रोल करताना आम्हाला एका बॉलिवूड स्टारचा बालपणीचा फोटो सापडला. फोटोंमध्ये दिसणारा हा गोड, निरागस चेहऱ्याचा लहान मुलगा आज बॉलिवूडवर राज्य करत आहे.  हा फोटो पाहून तुम्हाला ओळखता येत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोटोमध्ये दिसणारी हा गोंडस मुलगा दुसरा कोणी नसून, किंग खान शाहरुख आहे. 

फोटोमध्ये त्याला ओळखणे खूप कठीण आहे.  या फोटोतून शाहरुख अगदी लहानपणापासूनच गोड असल्याचं दिसतं. शाहरुख खान असा स्टार आहे ज्याचे स्टारडम अतुलनीय आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात त्यांचे चाहते आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या स्टार्सपैकी एक शाहरुख आहे.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर,  किंग खान शाहरुखसाठी 2023 वर्ष हे खूप खास ठरलं. वर्षाच्या सुरुवातीला 'पठाण' आणि त्यानंतर 'जवान' सिनेमाला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. आता त्याचा तिसरा चित्रपट 'डंकी' देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. एकाच वर्षात किंग खानचा तिसरा चित्रपट पाहायला मिळणार असल्याने चाहते खूप उत्साहित आहेत.

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडसेलिब्रिटी