Join us
Daily Top 2Weekly Top 5

चंदेरी दुनिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:14 IST

बॉलिवूड नावाच्या चंदेरी दुनियेतल्या चमचमत्या सितार्‍यांकडे पाहिले की असे वाटते, 'यार लाईफ असावं तर अस्संच..काय पण यांचे नशीब आहे..ना ...

बॉलिवूड नावाच्या चंदेरी दुनियेतल्या चमचमत्या सितार्‍यांकडे पाहिले की असे वाटते, 'यार लाईफ असावं तर अस्संच..काय पण यांचे नशीब आहे..ना कसली चिंता.. ना कसलं टेन्शन. पडद्यावरचं आणि पडद्याबाहेरच त्यांचं झगमगीत आयुष्य पाहून आपल्यासारख्या सामान्यांना त्यांचा हेवा वाटणं सहाजिक आहे. पण, खरंच असं असतं का? की त्यांना मिळणार्‍या ग्लॅमर सारखीच त्यांची दुखणीही घवघवीत, ठसठशीत असतात? हो, शेवटी तेही माणसंच आहेत आणि त्यांनाही शारीरिक त्रासांना सामोरे जावेच लागते. यातील अनेक तार्‍यांनी आयुष्यात उद्भवलेल्या शारीरिक समस्यांना मोठय़ा हिमतीने तोंडही दिले आहे.