Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वरा भास्करला 'इट्स नॉट दॅट सिंपल २'च्या शूटिंग दरम्यान हे काम वाटले चॅलेजिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 20:17 IST

स्वरा भास्कर सध्या आगामी वेबसीरिज 'इट्स नॉट दॅट सिंपल २'चे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे.

अभिनेत्री स्वरा भास्करने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आता लवकरच ती 'इट्स नॉट दॅट सिंपल २' या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. या सीरिजमध्ये मेट्रो सिटीमध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेची कथा पाहायला मिळणार आहे. दानिश अस्लम दिग्दर्शित वायकॉम १८ प्लॅटफॉर्म सिझन २ घेऊन येत आहे. सध्या स्वरा या वेबसीरिजचे जोरदार प्रमोशन करताना दिसते आहे.

'इट्स नॉट दॅट सिंपल २' मध्ये लग्न व घटस्फोटादरम्यानच्या वादविवादावर भाष्य करण्यात आले आहे. यात स्वराने इंटिमेट सीनदेखील केले आहेत. याबाबत सांगताना स्वरा म्हणाली की, या सीरिजमधील इंटिमेट सीन करणे खूप कठीण होते. दिग्दर्शकाच्या मदतीने हे सीन व्यवस्थित करू शकले. सहकलाकार सुमीत खऱ्या आयुष्यात खूप चांगला व्यक्ती आहे. त्यामुळे या सीरिजमधील भांडण्याचा सीन करणे खूप कठीण गेले. तसेच यामध्ये पूरब कोहली व माझ्यामध्ये फाइट सीन आहेत. हे सीन करताना खूप मजा आली.सुमित म्हणाला की, 'इट्स नॉट सिंपल' चा भाग बनून मी खरोखरच रोमांचित झालो आहे. मला वाटते की ही एक अतिशय परिपक्व कथा होती आणि त्यानुसार मागच्या सीझनने अतिशय चांगली कामगिरी केली. यामुळे असं सिद्ध होत की प्रेक्षक खूप परिपक्व झाले आहेत. या शोची स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला ती खूप आवडली. मला आशा आहे की, आम्ही या कथेला नक्कीच न्याय देऊ. 

टॅग्स :स्वरा भास्कर