Join us

लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्यात सिनेतारकांची मांदियाळी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST

मुंबईत रंगलेल्या लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार 2017 च्या रेडकार्पेटवर अनेक सिनेतारकांचा जलवा दिसला. आलिया भट्ट गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये रेडकार्पेटवर अवतरली.

मुंबईत रंगलेल्या लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार 2017 च्या रेडकार्पेटवर अनेक सिनेतारकांचा जलवा दिसला. आलिया भट्ट गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये रेडकार्पेटवर अवतरली.ज्येष्ठ अभिनेते जितेन्द्र यांनी अशा स्टाईलिश अंदाजात लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्काराला हजेरी लावली.लाल रंगाच्या कुर्त्यात दिसला तो ‘खंडेराय’ देवदत्त नागे. लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्यात त्याने फोटोग्राफर्सला अशी पोझ दिली.लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री हेमांगी कवी हिला रंगभूमी स्त्री विभागात नामांकन मिळाले होते. या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर हेमांगीने पिवळ्या रंगाच्या साडीत दिसली.दिव्या खोसला कुमार हिनेही लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.सुप्रसिद्ध गायिक वैशाली सामंत हिने लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्यात अशा हटके थाटात एन्ट्री घेतली. तिच्या हातातील स्टाईलिश पर्स विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली.