Join us

कॅटने वजन कमी केल्याने निर्मात्यांची ‘गोची’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 12:50 IST

 ‘जग्गा जासूस’ जेव्हा रिलीज होईल तेव्हा खरंतर सेलिब्रेशनच करायला हवेय. कारण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान इतक्या अडचणी आल्या आणि अजूनही त्या ...

 ‘जग्गा जासूस’ जेव्हा रिलीज होईल तेव्हा खरंतर सेलिब्रेशनच करायला हवेय. कारण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान इतक्या अडचणी आल्या आणि अजूनही त्या अडचणी काही संपल्या नाहीत.आता नवीन अडचणी अशी आहे की, कॅटरिना कैफने वजन घटवल्यामुळे ती आता जग्गा जासूससाठी योग्य दिसत नाहीये. निर्माते चित्रपटाची शूटिंग पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. तिने वजन कमी केल्याने ती आता अगोदर सारखी दिसत नाहीये.वेल, कॅट तू वजन कमी केलेस हे तर उत्तमच केलेस. पण, आता निर्मात्यांची मात्र गोची केलीस ना!