Join us

कॅटच्या नव्या घरात भेटतात लव्हबर्ड्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 13:41 IST

 वेल, आपल्याला वाटतेय की, कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्यात बे्रकअप झालेला आहे. त्यांना ‘जग्गा जासूस’ चे शूटींगही कसेबसे ...

 वेल, आपल्याला वाटतेय की, कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्यात बे्रकअप झालेला आहे. त्यांना ‘जग्गा जासूस’ चे शूटींगही कसेबसे पूर्ण करावयाचे आहे. त्यामुळे त्यांच्यात भेटीगाठी देखील बंद आहेत, असा आपला समज आहे. पण, तसे काहीच नाहीये. ते दोघे भेटत आहेत, बोलत आहेत. पण कुठे? हेच तर आहे खरं सिक्रेट!त्यांचे सिक्रेटली भेटण्याचे ठिकाण नुकतेच सुत्रांकडून कळाले आहे. त्या दोघांचा एक मित्र कॅटरिनाला भेटण्यासाठी तिच्या नव्या घरी गेला. तो गेला असता तिच्या घरातून रणबीर बाहेर येताना दिसला. हा मित्र मात्र आश्चर्यचकित झाला. पण, त्या दोघांनाही याचे  काहीच वाटले नाही.थोडक्यात काय, तर आपण उगाचच चिंता करत बसलोय की ते दोघे केव्हा एकत्र येतील? पण ते तर भेटताहेत, बोलताहेत. मग कशाला चिंता करता? रणबीर-कॅटच्या चाहत्यांसाठी ही तर गोड बातमीच म्हणावी लागेल.